जागतिक मंदीतही गुंतवणुकदारांचा कल भारताकडे : मार्क मोबियस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mark Mobius

जागतिक मंदीतही गुंतवणुकदारांचा कल भारताकडे : मार्क मोबियस

चीनबरोबर भारताची व्यापार तूट वेगाने वाढत आहे. असे असतानाही चीनमधून भारतात गुंतवणुक होण्याचा कल वाढत आहे. असे मोबियस कॅपिटल पार्टनर्सचे संस्थापक मार्क मोबियस यांनी द प्रिंटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

भारताची व्यापार तूट 2021-22 या आर्थिक वर्षात $72.9 अब्ज होती, जी मागील वर्षी $44 अब्ज होती. यावर्षी, एप्रिल ते ऑगस्ट या केवळ पाच महिन्यांत, तूट आधीच $ 37 अब्ज झाली आहे.

हेही वाचा : का हवे विचारांचे नियम आणि वास्तविक भान !

अगोदरच कोविड महामारी, चीनचे कडक लॉकडाऊन आणि अमेरिकेसोबत सुरू असलेले 'तंत्रज्ञान युद्ध' यामुळे उत्पादकांचा कल भारतातील तांत्रिक हार्डवेअर उद्योगाकडे चालला आहे.

शेअर बाजार तज्ज्ञ मार्क मोबियस यांच्या मते, महागाई आणि उच्च व्याजदरामुळे घाबरलेले गुंतवणूकदार पुढील सहा ते १२ महिन्यांसाठी अधिक चांगला परतावा मिळू शकतील अशा बाजारपेठांचा शोध घेत आहेत. गुंतवणूकदार आता चिनी शेअर बाजाराकडे दुर्लक्ष करून तेथून पैसे काढत आहेत. जागतिक गुंतवणूकदार आता भारतीय शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास तयार आहेत. भारतातील समभागांचे मूल्यांकन सरासरीपेक्षा जास्त आहे आणि जागतिक गुंतवणूकदारांना यामध्ये परतावा मिळण्याची चांगली शक्यता आहे.

हेही वाचा: Jandhan Account : खात्यात पैसे नसले तरी मिळणार 10 हजार रुपयांचा लाभ

मार्क मोबियस म्हणाले की, सध्या जगभरातील देशांमध्ये महागाई वाढली आहे. त्यामुळे केंद्रीय बँका व्याजदर वाढवण्यात गुंतल्या आहेत. जागतिक मंदीचे सावट असतानाही भारताकडे एक अब्ज लोकसंख्या, स्पर्धात्मक वेतन आणि तरुण लोकसंख्या असलेली क्षमता आहे. त्यात उत्पादन वाढवण्याची आणि बरीचशी चीनी आयात काढून टाकण्याची क्षमता आहे. या कारणामुळे  चीनमधील गुंतवणूकदार भारताच्या शेअर बाजारात गुंतवणुक करण्यास उत्सुक आहेत.

गेल्या काही दिवसांपासून गुंतवणूकदार चीनी शेअर बाजारातून पैसे काढण्यात व्यस्त आहेत. मार्क मोबियस म्हणाले की, अलीकडच्या काळात, चीनमधील मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांनी चीनी शेअर बाजारात गुंतवणुक करण्यास नकार दिला आहे.