IPO: Tracxn Technologies कंपनीचा आयपीओ 10 ऑक्टोबरला खुला होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ipo

IPO: Tracxn Technologies कंपनीचा आयपीओ 10 ऑक्टोबरला खुला होणार

ट्रॅक्सन टेक्नोलॉजीचा (Tracxn Technologies) आयपीओ (IPO) 10 ऑक्टोबरला खुला होणार आहे. कंपनीचा आयपीओ 309 कोटी रुपये असेल आणि त्यासाठी 75-80 रुपये प्राईस बँड निश्चित केला आहे. 10 ऑक्टोबरला आयपीओ खुला होऊन 12 ऑक्टोबरला बंद होणार आहे.

कंपनीचा आयपीओ ऑफर फॉर सेल (OFS) आहे. म्हणजेच, कंपनी कोणतेही नवीन शेअर्स जारी करणार नाही, पण तिचे प्रमोटर्स आणि विद्यमान शेअरहोल्डिर्स त्यांच्या शेअर्सचा हिस्सा विक्रीसाठी ठेवतील. अशा परिस्थितीत, आयपीओद्वारे जमा केलेली रक्कम कंपनीच्या खात्यात जाणार नाही, पण तिच्या प्रमोटर्स आणि शेअरहोल्डर्सकडे जाईल. (ipo of Tracxn Technologies company will start on 10 october)

हेही वाचा: Tata Sons: एन चंद्रशेकरनच राहणार पुढील पाच वर्षांसाठी कार्यकारी अध्यक्ष

प्रमोटर्स नेहा सिंग आणि अभिषेक गोयल 76.62-76.62 लाख शेअर्स विकतील. याशिवाय फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांच्याकडे असलेले 12.63-12.63 लाख शेअर्सही विकणार आहेत.

कंपनीच्या 75-80 रुपये प्रति शेअरच्या प्राइस बँडनुसार, कंपनीला खालच्या पातळीवरील शेअर्समधून 209 कोटी रुपये आणि वरच्या पातळीवरील विक्रीतून 309 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा: Sugar Stock: फक्त 55 रुपयांचा 'हा' स्टॉक वाढवेल तुमच्या पोर्टफोलिओची गोडी

ट्रॅक्सन टेक्नोलॉजीचा (Tracxn Technologies) हा 'सॉफ्टवेयर ऍज अ सर्व्हिस' (SaaS) मॉडेलवर काम करतो. याद्वारे खासगी कंपन्यांच्या माहितीची देवाणघेवाण होते. ट्रॅक्सन टेक्नॉलॉजीजमध्ये गुंतवणूक केलेल्या काही प्रमुख गुंतवणूकदारांमध्ये टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा, फ्लिपकार्टचे सह-संस्थापक बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल आणि डेल्हिवरीचे सह-संस्थापक साहिल बरुआ यांचा समावेश आहे.

जून तिमाहीच्या अखेरीस, ट्रॅक्सनने अंदाजे 58 देशांमधील 1,139 कस्टमर्सच्या खात्यांमध्ये 3,271 यूझर्सची नोंदणी केली आहे. त्याचे काही कस्टमर्स फॉर्च्युन 500 कंपन्या किंवा त्यांच्या सहयोगी म्हणून लिस्टेड आहेत.

हेही वाचा: Share Market: सुरुवातीच्या घसरणीनंतर शेअर बाजार सावरला, Sensex 59,085 अंकावर स्थिरावला

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.