Jio पुन्हा देणार ग्राहकांना मोठा धक्का..

Jio पुन्हा देणार ग्राहकांना मोठा धक्का..

नवी दिल्ली : दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ येत्या काही आठवड्यांमध्ये 'फोन कॉल' आणि 'डेटा' शुल्कामध्ये वाढ करणार आहे. व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेल यांची याबाबतची घोषणा केलीये. अशात आता आता मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओनेसुद्धा मोबाईल सेवा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

दूरसंचार क्षेत्रातील तीव्र स्पर्धेला तोंड देताना महसूलात वाढ होण्यासाठी या कंपन्यांनी मोबाईल सेवा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

'इतर दूरसंचार कंपन्यांप्रमाणेच आम्हीसुद्धा सरकारच्या सहकार्याने या क्षेत्रातील अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न करत असून भारतातील ग्राहकांना जास्तीत जास्त फायदा पोचवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. येत्या काही आठवड्यात आम्ही सेवा शुल्कांमध्ये वाढ करण्याचा निर्णय अशा पद्धतीने अंमलात आणणार आहोत की त्यामुळे डेटाचा वापर किंवा डिजिटल क्षेत्रातील वाढीला खीळ बसणार नाही आणि आम्ही  केलेली गुंतवणूकदेखील सुरक्षित राहील' - रिलायन्स जिओ

जिओ आणि तिच्या प्रतिस्पर्धी कंपन्या व्होडाफोन आयडिया, भारती एअरटेल यांनी एकाचवेळी मोबाईल सेवा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर महिन्यापासून मोबाईल सेवा शुल्कात वाढ केली जाणार आहे. तज्ज्ञांच्या मते, देशातील दूरसंचार क्षेत्रासाठी ही एक सकारात्मक बाब असणार आहे.

दरम्यान आता सर्वच कंपन्यांकडून करण्यात आलेल्या दरवाढीवर ग्राहक कशी प्रतिक्रिया देतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 

WebTitle :  jio to increase there calling and data charges in coming future

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com