Share Market: या 10 शेअर्सवर ठेवा नजर; जाणून घ्या शेअर बाजाराचा मूड

Stocks to Buy Today: प्रचंड अस्थिरतेच्या दरम्यान, शुक्रवारी बाजार सलग चौथ्या दिवशी तेजीसह बंद झाला.
Stocks to Buy Today | Trading Tips
Stocks to Buy Today | Trading TipsSakal

Stocks to Buy Today: प्रचंड अस्थिरतेच्या दरम्यान, शुक्रवारी बाजार (Share Market) सलग चौथ्या दिवशी तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स (Sensex) 85.91 अंकांच्या अर्थात 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 55,550.30 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी (Nifty) 35.55 अर्थात 0.21 टक्क्यांच्या वाढीसह 16630.45 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

कमजोरीसह उघडल्यानंतर सेन्सेक्स-निफ्टीने शुक्रवारी सुधारणा पाहिली आणि दिवसभर आपली आघाडी कायम राखल्याचे चॉईस ब्रोकिंगचे सचिन गुप्ता म्हणाले. तांत्रिक दृष्टीकोनातून, डेली चार्टवर इनसाइड बार कॅंडलस्टिक तयार केला. याशिवाय, निर्देशांक मि़डल बोलिंजर बँड फॉर्मेशनच्या खाली व्यापार करत आहे जे 16,850 जवळ रझिस्टंस दाखवत आहे.

Stocks to Buy Today | Trading Tips
Share Market: निवडणूक निकालांनंतर सेन्सेक्समध्ये 246.39 तर निफ्टीमध्ये 66.10 अंकांची घसरण

सध्या, निफ्टीला 16,350 वर सपोर्ट दिसत आहे. त्याच वेळी, 16850 वर रझिस्टंस आहे. दुसरीकडे, बँक निफ्टीला 33,700 वर सपोर्ट दिसत आहे. त्याच वेळी, 35,000 वर रझिस्टंस दिसत आहे.

ब्रॉडर मार्केटसाठीही चांगली चिन्हे आहेत. सध्या, एनबीएफसी आणि एफएमसीजी सेक्टरचा रिस्क रिवॉर्ड रेश्यो चांगला दिसत आहे तर मेटल शेअर्स अस्थिर आहेत. त्यामुळे त्याच्यातील धोक्याचा अंदाज बांधणे कठीण होईल असेही ते म्हणाले.

Stocks to Buy Today | Trading Tips
Share Market: शेअर बाजार वधारला; सेन्सेक्समध्ये 369.9 तर निफ्टी 64.55 अंकांची वाढ

आजचे टॉप 10 शेअर्स?

सिप्ला (CIPLA)

बीपीसीएल (BPCL)

सनफार्मा (SUNPHARMA)

जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC)

टीव्हीएस मोटर्स (TVSMOTORS)

ट्रेंट (TRENT)

एयू बँक (AUBANK)

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)

एमआरएफ (MRF)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com