Last IPO 2022 : वर्षातील शेवटचा IPO 30 डिसेंबरला होणार खुला, जाणून घ्या डिटेल्स

या आयपीओअंतर्गत, 10 रुपये फेस व्हॅल्यू असणारे 1.02 कोटी नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील.
IPO
IPO Sakal

Sah Polymers IPO : यावर्षीचा अर्थात 2022 चा शेवटचा आयपीओ यावर्षी 30 डिसेंबरला खुला होणार आहे.

Also read- Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

IPO
Infra Investment Trust लवकरच आणणार IPO, सेबीकडे कागदपत्र दाखल

साह पॉलिमर्स (Sah Polymers) या आघाडीच्या पॉलिमर बॅग बनवणाऱ्या कंपनीने चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत बाजार नियामक सेबीकडे कागदपत्र दाखल केले होते.

सेबीने 31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरनंतर आयपीओसाठी मान्यता दिली. त्यामुळेच आता त्याचा आयपीओ 30 डिसेंबरला खुला होणार आहे, जो या वर्षातील शेवटचा आयपीओ असेल. शेअर्सची लिस्टींग पुढील वर्षी 12 जानेवारीला होईल. या आयपीओअंतर्गत, 10 रुपये फेस व्हॅल्यू असणारे 1.02 कोटी नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील.

IPO
TATA, Amazon आणि Reliance ला देणार दक्कर! कंपनी नवीन IPO आणण्याची तयारीत; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह

साह पॉलिमर्सचा आयपीओ 30 डिसेंबर ते 4 जानेवारी 2023 पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल. याअंतर्गत, कंपनी 1.02 कोटी नवीन इक्विटी शेअर्स जारी करेल. इश्यूच्या 75 टक्के पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB), 15 टक्के गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) आणि 10 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असतील.

शेअर्सचे वाटप 9 जानेवारीला होईल आणि बीएसई-एनएसईवर 12 जानेवारीला लिस्टिंग होईल. इश्यूचे रजिस्ट्रार लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहेत. याद्वारे उभारलेला निधी कंपनीची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी, कर्जाची परतफेड करण्यासाठी, कंपनीच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरला जाईल.

IPO
Tata Technologies IPO : गुंतवणूकदारांसाठी कमाईची संधी! 18 वर्षांनी येणार टाटा कंपनीचा IPO

साह पॉलिमर्स पॉलीप्रॉपिलीन/हाय-डेंसिटी पॉलीथिलीन एफआयबीसी बॅग्स, विणलेल्या सॅक, पॉलीप्रॉपिलीन/हाय-डेंसिटी पॉलीथिलीन विणलेले कापड आणि पॉलिमर तयार करते. त्यांची उत्पादने ऍग्रो पेस्टिसाइड्स, औषध, सिमेंट, रसायन, खते, अन्न उत्पादने, फॅब्रिक्स, टाइल्स आणि स्टील उद्योगातील कंपन्यांना पुरवली जातात.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com