LIC Policy : केवळ 71 रुपयांची गुंतवणूक अन् मॅच्युरिटीवेळी मिळणार 48 लाख

लोकांना चांगला परतावा मिळावा यासाठी एलआयसी विविध स्किम्स आणत असते.
LIC Policy
LIC Policy esakal

LIC New Premium Endowment Policy : गुंतवणुकीसाठी अनेकजण विविध पर्यायांचा विचार करत असतात. त्यात भारतीय नागरिकांचा गुंतवणुकीसाठी LIC वर अढळ विश्वास आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

LIC Policy
LIC Policy: LIC च्या योजनेत रोज 110 रुपये गुंतवा आणि मिळवा तिप्पट रिटर्न

लोकांना चांगला परतावा मिळावा यासाठी एलआयसी विविध स्किम्स आणत असते. अलिकडेच एलआयसीकडून एक स्किम सादर करण्यात आली आहे. एलआयीसी न्यू प्रीमियम एंडोमेंट योजना असे या स्किमचे नाव आहे.

या स्किममध्ये ग्राहकांना केवळ ७१ रुपये गुंतवणूक करून मॅच्युरिटीवेळी ४८ लाख रुपये मिळू शकतात. ही योजना नियमित उत्पन्न योजनेसाठी आणि मुदतीच्या शेवटी एकरकमी रकमेसाठी डिझाइन करण्यात आलेली आहे. LIC ची ही योजना कर्जाची थकबाकी, मुलांचे शिक्षण,आर्थिक मदत आणि भविष्यातील गरजा पूर्ण करण्यास उपयुक्त ठरू शकते.

LIC Policy
WhatsApp Update : नवीन वर्षात घरबसल्या WhatsApp वरून काढता येणार LIC ची जंबो पॉलिसी

कोण करू शकतं गुंतवणूक

LIC ची न्यू प्रीमियम सेटलमेंट स्किममध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही पात्रता असणे गरजेचे आहे. त्याची पूर्तता केल्याशिवाय गुंतवणूक करता येणार नाहीये. गुंतवणुकदार वयाच्या ८ ते ५५ वर्षांपर्यंत खरेदी येऊ शकते. या पॉलिसीची मुदत १२ ते ३५ वर्षे असून, यामध्ये किमान गुंतवणूक रक्कम १ आणि कमाल रकमेवर कोणतीही मर्यादा नाहीये.

LIC Policy
LIC Service : LIC ची मोठी घोषणा; ग्राहकांसाठी करणार 'हा' बदल

मिळणार ४८ लाखांचा परतावा

जर, एखाद्या गुंतवणूकदाराने वयाच्या १८ व्या वर्षी या योजनेअंतर्गत ३५ वर्षांचा पर्याय निवडला तर, त्याला १० लाख रुपयांच्या विमा रकमेसाठी वार्षिक २६,५३४ रुपये गुंतवावे लागतील. दुसऱ्या वर्षापासून हा प्रीमियम २५,९६२ रुपये असेल. अशा परिस्थितीत, तुम्हाला दररोज सुमारे ७१ रुपये गुंतवावे लागतील. मॅच्युरिटीवर तुम्हाला ४८ लाख रुपये मिळू शकतात. कोणताही गुंतवणूकदार एलआयसीच्या जवळच्या कार्यालयात जाऊन या पॉलिसी अंतर्गत नोंदणी करू शकतो. येथे तुम्हाला या योजनेची सविस्तर माहितीदेखील मिळू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com