सावधान! तुम्हीही अ‍ॅपवरून झटपट कर्ज घेण्याचा विचार करत आहात? मग वाचा ही बातमी | Loan App Fraud | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Loan Apps Fraud
सावधान! तुम्हीही अ‍ॅपवरून झटपट कर्ज घेण्याचा विचार करत आहात? मग वाचा ही बातमी | Loan App Fraud

सावधान! तुम्हीही अ‍ॅपवरून झटपट कर्ज घेण्याचा विचार करत आहात? मग वाचा ही बातमी

Loan Apps Fraud: अनेकदा आपण आर्थिक अडचणींमध्ये असतो, जवळच्या व्यक्तींची मदत घेण्यापेक्षा एखाद्या अ‍ॅपच्या माध्यमातून कर्ज घेऊन पैसे परत करावे असा विचार आता लोकं करत आहेत. ज्याचाच फायदा या कर्ज देणारे अ‍ॅप घेत आहेत.डिजिटल कर्ज देण्याच्या नावाखाली लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण हे खरे आहे. या कंपन्या अ‍ॅपद्वारे झटपट कर्ज देतात ही गोष्ट खरी. पण कर्ज घेणाऱ्या व्यक्तीकडे कर्जाची परतफेड करण्यासाठी उत्पन्न आहे की नाही हेही पाहत नाही. मग या कंपन्यांचे एजंट कर्जवसुलीच्या नावाखाली ग्राहकांशी गैरव्यवहार करतात. यातच अनेक त्रासलेल्या लोकांनी आत्महत्या केल्याचे एका वेबसाईटचे वृत्त आहे.

हेही वाचा: Share Market: किरकोळ घसरणीसह शेअर बाजार सुरु; सेन्सेक्स 221 तर निफ्टी 64 अंकांनी घसरला

राजेश (नावे बदलली आहेत) आर्थिक संकटात असल्याने कर्ज देणार्‍या अ‍ॅपवरून 5000 रुपयांचे कर्ज घेतले होते. मुदतीनंतर एजंट कर्ज वसुलीसाठी त्यांच्या घरी पोहोचले, न्यूड फोटो मॉर्फ करून त्यावर राजेशचा चेहरा टाकला आणि ते त्यांच्या मोबाईलमधील सर्व काँटॅक्ट्सना पाठवले. वसुली एजंट्सच्या याच सततच्या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे राजेश यांच्या भावाने सांगितले.


दुसऱ्या एका प्रकरणात, कार शोरूममध्ये काम करणाऱ्या 22 वर्षीय सुरेशला (नावे बदलली आहेत) आत्महत्या करण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप आहे. लोन अ‍ॅपच्या रिकव्हरी एजंटला कंटाळून त्याने हैदराबादमधील राहत्या घरी गळफास लावून घेतला. या अ‍ॅपद्वारे त्यांनी 12 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. पण, त्याला फक्त 8000 रुपये परत करता आले होते.

हैदराबादमध्ये डिजिटल कर्ज देण्याच्या नावाखाली फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, तेलंगणाच्या सायबर क्राइम सेलने 135 बनावट कर्ज अ‍ॅप्सची यादी जारी केली. यामध्ये UPA कर्ज, Mi Rupee आणि Hoo Cash यांचा समावेश आहे.

हेही वाचा: EPFO: पीएफ कर्मचारी झाले मालामाल! या दिवशी खात्यात येईल मोठी रक्कम

RBI वर्किंग ग्रुपच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी भारतात अशा 600 बनावट कर्ज देणार्‍या अ‍ॅप्सची ओळख पटली, जी लोकांना झटपट कर्ज देत होती. सुमारे 1,100 कर्ज देणारी ऍप्स भारतीय Android वापरकर्त्यांना झटपट कर्ज देत आहेत. RBI च्या पोर्टल 'Sachet' वर डिजिटल कर्ज देणार्‍या अ‍ॅप्सच्या विरोधात सुमारे 2,562 तक्रारी मिळाल्या आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Loan Apps Fraud Harassments Of People After Digital Loan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Apploansloan defaulter
go to top