पिपल्स कोऑपरेटिव्ह बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेचे निर्बंध

पीटीआय
Friday, 12 June 2020

कानपूरस्थित पिपल्स को-ऑपरेटिव्ह बॅंकेवर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे पुढील सहा महिन्यांसाठी पिपल्स को-ऑपरेटिव्ह बॅंकेला नवीन ठेवी स्वीकारता येणार नाहीत आणि नवीन कर्ज वितरणसुद्धा करता येणार नाही. पिपल्स को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या खराब आर्थिक स्थितीमुळे रिझर्व्ह बॅंकेने हे पाऊल उचलले आहे. याशिवाय पिपल को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या ठेवीदारांना बॅंकेतून पैसे काढण्यावरही आरबीआयने निर्बंध घातले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'१० जून २०२० पासून बॅंकेचे कामकाज संपल्यापासून बॅंकेला रिझर्व्ह बॅंकेच्या परवानगीशिवाय नवीन कर्जवितरण करता येणार, नवीन गुंतवणूक करता येणार नाही, कर्ज किंवा भांडवल उभारता येणार नाही, नवीन ठेवी स्वीकारता येणार नाहीत', असे रिझर्व्ह बॅंकेने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहेत. 

महागाईची आकडेवारी जुलैपर्यंत जाहीर न करण्याचा प्रस्ताव

रिझर्व्ह बॅंकेने पिपल्स को-ऑपरेटिव्ह बॅंकेला, बॅंकेची कोणताही मालमत्ता विकण्यास, हस्तांतरित करण्यास मनाई केली आहे. बॅंकेच्या खातेदारांना किंवा ठेवीदारांना कोणतीही रक्कम काढता येणार नाही, अशाही सुचना रिझर्व्ह बॅंकेने दिल्या आहेत. रिझर्व्ह बॅंकेचे हे निर्बंध बॅंकेचे १० जूनचे कामकाज संपल्यापासून पुढील सहा महिन्यांसाठी लागू असणार आहेत.

...तर भारत 9.5 टक्के विकासदर गाठेल : फिच रेटिंग्स

मात्र त्याचबरोबर पिपल्स को-ऑपरेटिव्ह बॅंकेवर फक्त निर्बंध घालण्यात आले आहेत. बॅंकेचा परवाना रद्द करण्यात आलेला नाही, हेदेखील रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केले आहे. बॅंकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईपर्यत बॅंकेला बॅंकिंग व्यवसाय करण्यास अटींसह परवानगी देण्यात आली आहे.

कोरोनाच्या संकटातही भारताची परकीय गंगाजळी वाढतेय

* रिझर्व्ह बॅंकेने सहा महिन्यांसाठी लागू केले निर्बंध 
* कानपूर स्थित पिपल्स को-ऑपरेटिव्ह बॅंक
* बॅंकेची आर्थिक स्थिती चिंताजनक असल्यामुळे आरबीआयने उचलेले पाऊल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI puts restrictions on Peoples Cooperative Bank