Scheme: दररोज 50 रुपये भरा आणि तयार करा मोठा फंड, पोस्टाची नवी स्कीम |Post Scheme | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

post

Scheme: दररोज 50 रुपये भरा आणि तयार करा मोठा फंड, पोस्टाची नवी स्कीम

प्रत्येकालाच भविष्याच्या दृष्टीने सेविंग्स करायचे असतात. पण प्रत्येक जण शेअर मार्केटसाठी जोखीम पत्करायला तयार नसतात. अशा सर्वांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण जर तुम्ही अशी योजना शोधत असाल जिथे तुम्हाला शेअर बाजारातील चढ-उतारांना सामोरे जावे लागणार नाही आणि सुरक्षेसह एक चांगला फंड तयार करायचा असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना (Rural Postal life Insurance) तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. इथे तुम्ही छोट्या गुंतवणुकीतून चांगला फंड तयार करू शकता.

हेही वाचा: Post office scheme : फक्त १०० रुपयांची गुंतवणूक करून मिळवा हजारोंचा परतावा

ही स्कीम 19 वर्ष ते 55 वर्ष वयोगटातील कोणतीही व्यक्ती घेऊ शकतात. ही योजना पोस्टाच्या ग्रामीण पोस्टल जीवन विमा कार्यक्रमांतर्गत (Rural Postal life Insurance) चालवली जाते. या योजनेअंतर्गत, किमान विमा रक्कम 10,000 रुपये आहे आणि कमाल विमा रक्कम 10 लाख रुपयांपर्यंत आहे. इथे तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम भरू शकता.

या पोस्ट ऑफिस योजनेचा मॅच्युरिटी जास्तीत जास्त 80 वर्षांत आहे. या अंतर्गत तुम्ही 1,500 रुपयांच्या गुंतवणुकीसह 50 लाख रुपयांपर्यंतचा निधी तयार करू शकता. यासाठी, तुम्हाला दररोज फक्त 50 रुपये गुंतवावे लागतील. 10 लाख रुपयांची किमान विमा रक्कम 1,515 रुपये, 58 वर्षाच्या व्यक्तीसाठी 1,463 रुपये आणि 60 वर्षाच्या व्यक्तीसाठी 1,411 रुपये असेल.

हेही वाचा: Share Market : लवकरच येतोय सरकारी कंपनीचा आणखी एक आयपीओ

या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर 4 वर्षांनी तुम्हाला कर्जाची सुविधा मिळते. याशिवाय, तुम्ही तुमचा नॉमिनीही फाईल करू शकता. पॉलिसी घेतल्यानंतर पॉलिसी घेणाऱ्याचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला पैसे दिले जातात. नॉमिनी नसेल, ते कायदेशीर वारसाला दिले जातात. पोस्टाच्या या स्कीममध्ये गुंतवणूक सुरू करण्यासाठी, तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडू शकता.

हेही वाचा: LIC: महिलांसाठी खास Scheme! दररोज 29 रुपयांच्या गुंतवणूकीवर मिळणार 4 लाख

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.