खुशखबर! स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे नव्या वाहन खरेदीवर मिळणार 5 टक्के सूट

nitin gadkari
nitin gadkari

नवी दिल्ली- नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबरी आहे. जे लोक स्क्रॅपिंग पॉलिसी अंतर्गत वाहन खरेदी करतील त्यांना ऑटोमोबाईल कंपनी 5 टक्के सूट देणार आहे. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या नुसार केंद्रीय बजेट 2021-22 मध्ये केंद्र सरकारने स्क्रॅपिंग पॉलिसीची घोषणा केली होती. ज्याला देशात लवकरच लागू केले जाईल. गडकरी यांनी सांगितल्यानुसार, या पॉलिसीमध्ये 4 फेज आहेत. यातील एक फेजमध्ये जुन्या वाहनाला स्क्रॅप केल्यानंतर नवीन वाहन खरेदी केल्यास तुम्हाला 5 टक्क्यांची सूट मिळेल. या स्क्रॅपिंग पॉलिसीचा किती फायदा होईल हे आपण पाहुया...

स्क्रॅपिंग पॉलिसी लागू झाल्यानंतर 20 वर्षे जुने खासगी वाहन आणि 15 वर्ष जुने कमर्शियल वाहनासाठी फिटनेस सर्टिफिकेटची आवश्यकता लागेल. गडकरी म्हणाले की, यासाठी automated fitness centres पीपीपी मोडमध्ये सुरु केले जातील. त्यामुळे देशात रोजगार वाढेल. 

स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे ऑटो सेक्टरमध्ये होणार वाढ

सध्या देशात जवळपास 4.5 कोटी रुपयांची ऑटो सेक्टरची वार्षिक उलाढाल आहे. गडकरी यांच्यानुसार, स्क्रॅपिंग पॉलिसी लागू झाल्यानंतर ऑटो सेक्टरचा व्यवसाय 10 कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल. त्यांनी सांगितलं की यामुळे 50 हजारपेक्षा अधिक लोकांना रोजगार मिळेल.  

नव्या वाहनाच्या किंमतीमध्ये 30 ते 40 टक्क्यांची होईल कमी

केंद्रीय मंत्र्याच्या म्हणण्यानुसार, ऑटो सेक्टरला नव्या वाहनांच्या निर्मितीसाठी लागणारे स्टील, रबर, अॅल्युमिनियम इत्याही सामानाची आयात करावी लागते. त्यामुळे नव्या वाहनांची किंमत वाढते. पण, नवी स्क्रॅपिंग पॉलिसी लागू झाल्यास हे चित्र बदलेल. स्टील, रबर अॅल्युमिनियमच्या आयातीची गरज पडणार नाही. त्यामुळे नव्या वाहनांच्या किंमतीमध्ये 30 ते 40 टक्क्यांची घट होईल. 

जुन्या वाहनांसाठी ग्रीन टॅक्स

स्क्रॅपिंग पॉलिसीशिवाय सरकार 8 वर्षे जुन्या वाहनांवर ग्रीन टॅक्स लागू करण्याची योजना बनवत आहे. यातून मिळणारे राजस्व प्रदुषणाच्या समस्येशी लढण्यासाठी वापरला जाईल. या योजनेअंतर्गत 8 वर्षांपेक्षा अधिक जुन्या असणाऱ्या वाहनांवर ग्रीन टॅक्स लावला जाईल. फिटनेस प्रमाणपत्र नुतनीकरण करताना 10 ते 25 टक्क्यांचा ग्रीन टॅक्स लावला जाण्याची शक्यता आहे. भारत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com