Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमत

आंतरराष्‍ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असताना 21 मे पासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.
Petrol Diesel Prices
Petrol Diesel Pricesesakal

Petrol-Diesel Price Today, 5th June, 2022: तेल विपणन कंपन्यांनी दररोजप्रमाणेच आज (रविवार), 5 जून रोजी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या इंधनाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि डिझेलची किंमत 89.62 रुपये प्रति लिटर आहे.तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आज एक लिटर पेट्रोलचा दर 111.35 रुपये आणि डिझेलचा दर 97.28 रुपये आहे. चेन्नईत एक लिटर पेट्रोलचा दर 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. त्याच वेळी, कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. आंतरराष्‍ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असताना 21 मे पासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

Petrol Diesel Prices
Petrol-Diesel Price: काश्मीर ते कन्याकुमारी, काय आहेत पेट्रोल डिझेलचे आजचे दर; जाणून घ्या

पेट्रोल आणि डिझेलची नवीनतम किंमत

शहराचे नाव पेट्रोल रु. पेट्रोल प्रति लिटर रु. प्रति लिटर

दिल्ली- ९६.७२ ८९.६२

मुंबई- 111.35 97.28

चेन्नई- 102.63 94.24

कोलकाता- 106.03 92.76

सरकारने दिला मोठा दिलासा-

21 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 8 रुपयांनी आणि डिझेल 6 रुपयांनी कमी केल्यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर काही राज्यांनीही व्हॅट कमी केला होता, यामध्ये राजस्थान, केरळ आणि महाराष्ट्र सरकारचा समावेश आहे. राज्यस्तरीय करामुळे, वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भिन्न आहेत.

Petrol Diesel Prices
Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; तुमच्या शहरांतील दर काय?

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com