Post Office | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत तुमचे पैसे होतील दुप्पट... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kisan Vikas Patra yojana

पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटनुसार, या योजनेतील तुमचे पैसे गॅरंटीसह 124 महिन्यांत दुप्पट होतील.

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत तुमचे पैसे होतील दुप्पट...

एखाद्या गुंतवणूकदाराला त्याच्या कष्टाचे पैसे अशा ठिकाणी गुंतवायचे आहेत की जिथे ते सुरक्षित राहतील आणि चांगला परतावा देखील देतील. तर पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना सुरक्षित गुंतवणुकीसाठी आणि चांगले परतावा मिळवण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. ही पोस्ट ऑफिस बचत योजनांपैकी एक आहे, जी हमखास परतावा देते. किसान विकास पत्रावर 6.9 टक्के दराने व्याज मिळत आहे.

हेही वाचा: पोस्ट ऑफिस, पोस्टमनच्या माध्यमातून मिळणार जनधन’चे पैसे

इंडिया पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या पोस्ट ऑफिस योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 124 महिन्यांचा आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट होतील. म्हणजेच गुंतवणूकदारांचे पैसे 10 वर्ष 4 महिन्यांत दुप्पट होतात. यामध्ये किमान गुंतवणूक 1000 रुपये आहे. गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. पोस्ट ऑफिस स्कीम्सवर सरकारी हमी उपलब्ध आहे, म्हणजे त्यात कोणताही धोका नाही.

हेही वाचा: आता पोस्ट ऑफिस देणार अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला टक्कर

- सर्टिफिकेट स्वरूपात गुंतवणूक

किसान विकास पत्र (KVP) मध्ये सर्टिफिकेटच्या स्वरूपात गुंतवणूक केली जाते. तुम्ही हे सर्टिफिकेट 1,000 रुपये, 5,000 रुपये, 10,000 रुपये आणि 50,000 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. ही प्रमाणपत्रे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित (Transfer) केली जाऊ शकतात.

- व्याजदराची रचना

जर एखाद्याने जानेवारी ते मार्च 2020 या तिमाहीत या योजनेत गुंतवणूक केली असेल तर त्यांना वार्षिक 7.9 टक्के व्याजदर मिळेल. किसान विकास पत्र अंतर्गत खाते उघडण्यासाठी सध्या 6.9 टक्के व्याज मिळते. एप्रिल ते जून २०२० मध्ये किसान विकास पत्रातील व्याजदर 7.6 टक्क्यांवरून 6.9 टक्के करण्यात आला. त्यानंतर त्याचा व्याजदर स्थिर राहतो.

हेही वाचा: "पोस्ट ऑफिस आपल्या दारी' 

- कर सवलत नाही

किसान विकास पत्रातील गुंतवणुकीवर तुम्हाला कोणत्याही कर सवलतीचा लाभ मिळत नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

नोंद - कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top