बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? | Pre Analysis of share Market | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market update

बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

सोमवारी सेन्सेक्स 87 अंकांनी घसरून 54395 वर आणि निफ्टी 5 अंकांनी घसरून 16216 वर बंद झाला. मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. बँकिंग शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली.

एनर्जी, मेटल, रिअॅल्टी शेअर्समध्येही खरेदी झाली. ऑटो, फार्मा शेअर्समध्येही वाढ झाली. दुसरीकडे, आयटी शेअर्समध्ये विक्री दिसून आली. (Pre Analysis of share Market)

हेही वाचा: Stock market closing update : शेअर बाजार घसरणीसह बंद

निफ्टी बँक 346 अंकांनी वाढून 35,470 वर बंद झाला. मिडकॅप 259 अंकांनी वाढून 27,908 वर बंद झाला. सेन्सेक्सने खालच्या पातळीवरून 305 अंकांची सुधारणा केली. निफ्टीने खालच्या स्तरावरून 100 अंकांची सुधारणा केली. निफ्टी बँक खालच्या पातळीपासून 463 अंकांनी सुधारली.

मिडकॅपने खालच्या पातळीवरून 412 अंकांची सुधारणा केली. निफ्टीमधील 50 पैकी 28 शेअर्स वधारले. त्याच वेळी, सेन्सेक्समधील 30 पैकी 15 शेअर्समध्ये वाढ दिसून आली. निफ्टी बँकेचे 12 पैकी 10 शेअर्स तेजीत होते.

हेही वाचा: बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

शेअर बाजाराची नजर आता पहिल्या तिमाहीच्या निकालांवर असल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. आयटी सेक्टरच्या कमकुवत सुरुवातीमुळे बाजारात खराब वातावरण दिसून आले, त्यामुळे बेंचमार्क निर्देशांक कमजोरीसह उघडले. पण, बँकिंग, मेटल आणि एनर्जी शेअर्समधील नफ्यामुळे त्यांचे नुकसान भरून काढत बाजार सपाट बंद झाले.

भारतातील जून महिन्यातील महागाईची आकडेवारी आज अर्थात 12 जुलै रोजी येणार आहे. मे महिन्यात ते 7.04 टक्के राहण्याची शक्यता आहे. यानंतर अमेरिकेतील महागाईचा डेटा 1 दिवसानंतर येणार आहे. मे महिन्याच्या 8.6 टक्क्यांपासून ते आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा: मुंबईत महिनाभर पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; पेट्रोल १११.३५ रुपये प्रतिलीटर

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती ?

कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणतात की 8 जुलैला आलेला TCS Q1 चा निकाल अपेक्षेपेक्षा कमकुवत होता. आयटी शेअर्समधील कमजोरीमुळे सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण दिसून आली. युरोपियन बाजारातील कमजोरीमुळे सुरुवातीच्या व्यापारावरही दबाव आला. पण सकाळच्या घसरणीनंतर निफ्टीला 16100 च्या जवळ सपोर्ट मिळाला आणि मग चांगली रिकव्हरी झाली.

ट्रेडर्ससाठी, 16100 च्या पातळीवर सपोर्ट आणि 16300 वर रझिस्टंस दिसत आहे. जोपर्यंत निफ्टी 16100 च्या वर राहील तोपर्यंत तो तेजीत राहील आणि निफ्टी 16300-16350 च्या दिशेने जाताना दिसेल. दुसरीकडे, जर तो 16100 च्या खाली घसरला तर त्यात 16050 ची पातळी दिसून येईल.

हेही वाचा: सोन्याचे दर स्थिर; प्रतिग्रॅम दर साडे चार हजारांहून अधिक

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

आयशर मोटर्स (EICHERMOTORS)
ओएनजीसी (ONGC)
टाटा स्टील (TATASTEEL)
डॉ. रेड्डी (DRREDDY)
महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)
भारती एअरटेल (BHARTIARTL)
टीसीएस (TCS)
एचसीएल टेक (HCLTECH)
इन्फोसिस (INFY)
बीपीसीएल (BPCL)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Pre Analysis Of Share Market Update 12 July 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..