Share Market : आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market Today

Share Market : आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?

मंगळवारी सेन्सेक्स, निफ्टी जवळपास 1 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 563 अंकांनी वाढून 60656 वर बंद झाला आणि निफ्टी 158 अंकांनी वाढून 18053 वर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये फ्लॅट क्लोजझिंग दिसले, तरी सर्वाधिक खरेदी एनर्जी, एफएमसीजी आणि रियल्टी शेअर्समध्ये झाली.

इन्फ्रा आणि आयटी संबंधित शेअर्समध्येही तेजी दिसून आली. दुसरीकडे, 2 दिवसांच्या वाढीनंतर, पीएसयू बँक इंडेक्समध्ये विक्री झाली. मात्र, खासगी बँकांमधील खरेदीमुळे निफ्टी 16 अंकांनी वाढून 42235 वर बंद झाला. तर मिडकॅप 35 अंकांनी घसरून 31218 वर बंद झाला.

हेही वाचा: Share Market Closing : Sensex मध्ये 400 अंकाची तेजी, आयटी अन् बँकीग शेअर्समध्ये वाढ

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

गेल्या काही ट्रेडिंग सत्रांपासून बाजार नकारात्मक ट्रेंडसह सुस्ती दाखवत असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांचे म्हणणे आहे. अमेरिकेतील महागाई कमी होण्याच्या आशेने आणि चीन पुन्हा उघडल्यापासून मागणी वाढल्याने जागतिक बाजारपेठांमध्ये तेजी दिसत आहे.

अशात भारतीय बाजारातही तेजी दिसून आली आहे. पण बाजाराचा अंडरटोन नकारात्मक ट्रेंडसह सावध राहण्याचा आहे.

हेही वाचा: Best Stock : मल्टीबॅगर ठरलेला 'हा' शेअर विक्री करण्याचा शेअर बाजार तज्ज्ञांचा सल्ला

तांत्रिकदृष्ट्या, बाजाराने डेली चार्टवर बुलिश कँडल तयार केली आहे. त्याने इंट्राडे चार्टवर हायर बॉटम फॉर्मेशन तयार केले आहे जे सध्याच्या पातळीपासून बाजारात आणखी चढ-उतार दाखवत आहे. 17950 ची लेव्हल हा एक मजबूत सपोर्ट आहे.

निफ्टीने याच्या वर टिकून राहिल्यास ही तेजी 18100-18200 पर्यंत जाऊ शकते. दुसरीकडे, जर निफ्टी 17950 च्या खाली घसरला तर ही घसरण 17900-17850 पर्यंत जाऊ शकते.

हेही वाचा: Stock Market In 2023 : नवीन वर्षात असा असेल शेअर बाजाराचा मूड; 'या' ६ गोष्टींचा होणार परिणाम

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
एल अँड टी (LT)
हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)
एचडीएफसी (HDFC)
एचसीएल टेक (HCLTECH)
टीसीएस (TCS)
इंडियन हॉटेल (INDHOTEL)
ऍस्ट्रल (ASTRAL)
पेज इंडिया (PAGEIND)
ए यू बँक (AUBANK)
व्होल्टास (VOLTAS)

हेही वाचा: Share Market Closing : बाजार सावरला, अंबानींच्या 'या' शेअरमध्ये मोठी तेजी

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.