esakal | ATM मधून पैसे काढताना घ्या काळजी नाहीतर...
sakal

बोलून बातमी शोधा

precautions should take when using atm

ATM मधून पैसे काढताना ग्रहकांनी काळजी घेतली पाहिजे, नाहीतर तुमचे तुमचे सगळे पैसे जाऊ शकतात.  

ATM मधून पैसे काढताना घ्या काळजी नाहीतर...

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: ग्राहकांचे पैसे बँकेत सुरक्षित राहण्यासाठी बॅंका आणि आरबीआय नेहमी बदल करत आहेत. काही दिवसांपुर्वीच आरबीआयने (RBI) डेबिट आणि क्रेडिट कार्डबद्दलचे काही नियम बदलले आहेत. तरीही ग्राहकांनी सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे. ग्राहकांच्या एका चुकीमुळे अकाउंटमधील सगळे पैसे जाऊ शकतात.  

ग्रीन लाईटचं महत्व:
तुम्ही ATM मध्ये पैसे काढायला गेला तर पहिल्यांदा  ATM मशिनमधील कार्ड स्लॉट नीट पाहून घ्यावे. जर तुम्हाला वाटलं की स्लॉटमध्ये काहीतरी गडबड आहे किंवा स्लॉट ढिला दिसत असेल तर त्या  ATMमध्ये पैसे काढने टाळावे. 

आपण  ATMमधून पैसे काढण्यासाठी गेल्यावर ATMच्या कार्ड स्लॉटमधील लाईट पाहिली पाहीजे. त्यात ग्रीन लाईट ( हिरवी) असेल तरच  ATMचा उपयोग करणे सुरक्षित आहे. जर  ATM स्लॉटमध्ये लाल लाईट असेल तर  ATMचा वापर करु नये. कारण त्यामुळे तुमच्या  ATM कार्डाचा गैरउपयोग करुन सगळे पैसे काढले जाऊ शकतात. जर  ATM स्लॉटमध्ये ग्रीन लाईट असेल तरच  ATM मशीनचा पैसे काढण्यासाठी वापर करणं सुरक्षित असतं. 

वाचा सविस्तर -ऑक्टोबर महिन्यात बँकांना 15 दिवस सुट्टी...

सगळे पैसे जाऊ शकतात-
हॅकर्स एटीएम मशीनमधील कार्ड स्लॉटमधून कोणत्याही वापरकर्त्याचा डेटा चोरू शकतात. ते एटीएम मशीनच्या कार्ड स्लॉटमध्ये एक डिव्हाइस ठेवतात जे तुमच्या कार्डची सर्व माहिती स्कॅन करते. मग ते ब्लूटूथ किंवा दुस-या वायरलेस डिव्हाइसवरून तुमचा डेटा चोरून तुमचं बॅंक अकाउंट खाली करू शकतात.

जर तुम्हाला कधी वाटले की तुम्ही हॅकर्सच्या जाळ्यात अडकला आहात आणि बँकही बंद असेल तर ताबडतोब तुम्ही पोलिसांशी संपर्क साधला पाहिजे. कारण तिथे तुम्हाला हॅकरच्या बोटांचे ठसे सापडतील. तुमच्या आजूबाजूला कोणाचे ब्लूटूथ कनेक्शन चाली आहे हेही तुम्ही पाहू शकता. यामुळे तुम्ही त्या हॅकरपर्यंत पोहोचू शकता.

सोनं घ्या सोनं! आत्ताच सोने खरेदी करणे ठरू शकतं फायदेशीर

तुमच्या डेबिट कार्डचा उपयोग करण्यासाठी हॅकर्सकडे तुमचा पिन नंबर असणे आवश्यक आहे. हॅकर्स कॅमेऱ्यातून पिन नंबर ट्रॅक करू शकतात. हे टाळण्यासाठी, जेव्हा तुम्ही एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी पिन नंबर टाकता त्यावेळी तुमचा पिन नंबर दुस-या हाताने झाका. जेणेकरून तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही दिसू शकणार नाही.

(edited by- pramod sarawale)