
नववर्षात महागाईचा झटका! कारपासून खाद्यतेलाच्या वाढणार किंमती
सध्या सर्वजण ख्रिसमस, नवीन वर्षाचा आनंद लुटत आहेत. पण नवीन वर्षात सर्वांनाच महागाईचा (Price Hike) फटका बसणार आहे. नव्या वर्षात खाद्यतेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. उत्पादन आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या कंपन्या २०२२ मध्ये उत्पादनांच्या किंमतीत वाढ करण्याची शक्यता आहे. पुढील तीन महिन्यांत उत्पादनांच्या किंमतीत ४ ते १० टक्क्यांनी वाढ होणार असल्याची शक्यता FMCG कंपन्यांनी व्यक्त केली आहे
हेही वाचा: जानेवारीमध्ये 14 दिवस बँका राहणार बंद; उरकून घ्या महत्त्वाची कामे
अशी होणार वाढ
डिसेंबर महिन्यात इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी उत्पादनांच्या किंमतीत ३ ते ५ टक्क्यांनी वाढ केली. त्यामुळे फ्रिज, वॉशिंग मशीन, एसीच्या किंमती वाढल्या. तर पुढच्या महिन्यात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमतीत १० टक्क्यांनी वाढ होणार आहे. तर ऑटो सेक्टरमध्ये मारूती सुझुकी, टाटा मोटर्स, हुंडाई, महिंद्रा अॅंड महिंद्रा, स्कोडा, वॉक्सवॅगन यासारख्या कंपन्यांनी आधीच दरवाढ केली आहे. तर, मारूती आणि हिरो मोटोकॉर्प कंपन्या नव्या वर्षात दरवाढ करणार आहेत.
हेही वाचा: वर्ष संपण्याआधी खरेदी करा 'हे' 6 मिडकॅप्स शेअर्स!

महागाई वाढण्याचा अंदाज
दरवाढ १२ टक्क्यांपर्यंत
हिंदुस्तान युनीलिव्हर, डाबर, ब्रिटानिया आदी कंपन्यांनी उत्पादनांच्या किमतीत ५ ते १२ टक्क्यांनी वाढ केली आहे. नववर्षात ही वाढ ५ ते १० टक्क्यांनी आणखी वाढणार आहे. येत्या काळात महागाईचा दर स्थिर राहिला तर किमती कमी करण्याचा विचार केला जाईल, असे डाबर कंपनीचे सीईओ मोहित मल्होत्रा यांनी सांगितले. याआधी कंपनीच्या उत्पादनावर आम्ही ४ टक्क्यांनी दरवाढ केली आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा: Investment Trends : क्रिप्टोत पुरुषांच्या तुलनेत महिलांची आघाडी
Web Title: Price Hike Expected 2022 Amid Rising Input Cost And Transportation Cost
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..