esakal | H-1B व्हिसामध्ये नवीन बदलाचा प्रस्ताव; सर्वाधिक फटका भारतीयांना़
sakal

बोलून बातमी शोधा

h1b visa

मागील काही दिवसांपासून परदेशी कामगारांना अमेरिकेत जाण्यासाठी असणारा H-1B बिझनेस व्हीसा चांगलाच चर्चेत आहे.

H-1B व्हिसामध्ये नवीन बदलाचा प्रस्ताव; सर्वाधिक फटका भारतीयांना़

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

वॉशिंग्टन: मागील काही दिवसांपासून परदेशी कामगारांना अमेरिकेत जाण्यासाठी असणारा H-1B बिझनेस व्हीसा चांगलाच चर्चेत आहे. आता H-1B व्हीसाबद्दलच्या नियमांत अजून काही बदल करण्याच्या तयारीत अमेरिका प्रशासन दिसत आहे. कारण अमेरिकेत आता अस्थायी व्यापारासाठी H-1B व्हीसा दिला जाऊ नये यासाठी प्रस्ताव मांडला आहे, ज्याचा अनेक भारतीयांवर परिणाम होणार आहे. H-1B बिजनेस व्हीसामुळे अनेक कंपन्यांमधील तंत्रज्ञान व्यावसायिकांना कमी कालावधीसाठी अमेरिकेतील साइटला भेट देऊन काम करता येते.

जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर परदेशी व्यावसायिकांना 'H-1B पॉलिसी' अंतर्गत कुशल कामगारांसाठी अमेरिकेत प्रवेश करण्याची परवानगी नाकारली जाऊ शकते. याचा फायदा अमेरिकेतील कामगारांना होण्याची शक्यता आहे. यामुळे अमेरिकी उद्योगधंद्यांच्या मालकांना त्यांच्या कुशल कामगारांना प्रोत्साहन देण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा अमेरिकन प्रशासनाला आहे.

कोरोनाकाळात Mutual Fundमध्ये गुंतवणूक कुठे आणि कशी कराल?

H-1B व्हिसा नेमका काय आहे ?
H-1B बिजनेस व्हीसा हा एक नॉन-इमिग्रंट व्हिसा आहे, ज्याअंतर्गत अमेरिकी कंपन्यांना विशेष तांत्रिक कौशल्य असलेल्या पदांवर परदेशी व्यावसायिकांची नेमणूक करण्याची परवानगी आहे. या व्हिसाच्या माध्यमातून तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या दरवर्षी भारत आणि चीनसारख्या देशांतील हजारो कर्मचाऱ्यांची नेमणूक करतात. त्या कामगारांना हा व्हीसा देण्यात येतो.  

अमेरिकेत H-1B बिजनेस व्हीसामुळे अमेरिकन नागरिकांच्या नोकऱ्या बाहेरील कामगार बळकावत आहेत. त्यामुळे अमेरिकेत बेरोजगारीचे प्रमाण काही प्रमाणात वाढत असल्याचे आरोप अमेरिकेतील अनेक राजकारणी करत आहेत.

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; उद्यापासून लागू होणार नवीन नियम

नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुका होत आहेत. फक्त दोन आठवडे शिल्लक असताना हे पाऊल अमेरिकन प्रशासनाकडून उचलण्यात येत आहे. नव्या नियमाचा भारतीय कुशल कामगार आणि देशातील विविध कंपन्यांवर परिणाम होणार आहे जे आपल्या तांत्रिक व्यावसायिकांना अमेरिकेतील साइटवर काम करण्यासाठी H-1B व्हिसावर अल्प काळासाठी पाठवले जाते.

(edited by- pramod sarawale)

loading image
go to top