जुन्या नोटा आणि नाणी विकणाऱ्यांनो सावधान ! रिझर्व्ह बँकेने दिला इशारा | Reserve Bank Of India | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RBI

जुन्या नोटा आणि नाणी विकणाऱ्यांनो सावधान ! रिझर्व्ह बँकेने दिला इशारा

नवी दिल्ली : भारतात गेल्या काही काळात जुन्या नोटा आणि नाणी विक्रीचा ट्रेण्ड वाढला आहे. लोक ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून आपले जुन्या नोटा आणि नाणी लाखो रुपयांमध्ये विकत आहेत. जुन्या वस्तूंचे चाहते अशा नोटा आणि नाणी हव्या तेवढ्या किंमतीत खरेदी करतात. जर तुम्हीही जुन्या नोटा आणि नाणी ऑनलाईन पोर्टलवर विकत असला तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, ही बातमी नक्की वाचा. वास्तविक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) अशा सर्वांसाठी एक आदेश जारी केला आहे. रिझर्व्ह बँक म्हणते, आरबीआयच्या नावाचा वापर करुन लोकांची दिशाभूल करित आहेत. हे पूर्णपणे चुकीचे आहे. (RBI Issued A Warning To Seller Of Old Notes And Coins)

हेही वाचा: कोरोनाच्या फटक्यातून सावरण्यास १५ वर्षे लागतील-‘आरबीआय’च्या अहवालातील अंदाज

रिझर्व्ह बँकेने काय म्हटले?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अधिकृत ट्विटर (Twitter) हँडलवर म्हटले आहे, की आरबीआयच्या निदर्शनास आले आहे, त्यांच्या नावाचा वापर करुन जुन्या नाणींची खरेदी आणि विक्री केली जात आहे. ही लोक नागरिकांकडून वसुलीही करित आहेत. आरबीआयने म्हटले, की अशा प्रकारे कोणत्याही व्यक्तीकडून या प्रकारे शुल्क घेण्याचा अधिकार कोणालाही देत नाही. तुमच्या माहितीसाठी आरबीआय या प्रकारे कोणतेही व्यवहार करित नाही. कोणीही या प्रकारच्या शुल्काची मागणी करु शकत नाही. आरबीआय कोणत्याही संस्थेला किंवा व्यक्तीला या प्रकारचे आर्थिक व्यवहारावर शुल्क घेण्यास परवानगी देत नाही.

हेही वाचा: LPG : घरगुती सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ; आर्थिक गणित कोलमडणार

रिझर्व्ह बँकेने सर्व लोकांना अशा प्रकारच्या फसवणूक करणाऱ्या ऑफरच्या जाळ्यात न अडकण्याचा सल्ला दिला आहे. याबरोबरच चुकीच्या पद्धतीने लोकांची दिशाभूल करणाऱ्या सर्वांनाच आरबीआयने इशारा दिला आहे. जर अशा हालचाली सुरुच राहिल्या तर संबंधित लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा बँकेने दिला आहे.

Web Title: Rbi Issued A Warning To Seller Of Old Notes And Coins

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top