सेबीकडून आणखी तीन IPO मंजूर

कोणत्या आहेत या कंपनीज, जाणून घेऊयात
 IPO
IPOSakal
Summary

कोणत्या आहेत या कंपनीज, जाणून घेऊयात.

लवकरच तीन कंपन्या IPO च्या शर्यतीत सहभागी होण्यासाठी तयार आहेत. श्रेष्ठा नॅचरल बायोप्रॉ़क्ट्स लिमिटेड (Sresta Natural Bioproducts Ltd), मैनी प्रिसिजन प्रॉडक्ट्स लिमिटेड (Maini Precision Products Ltd) आणि कॅम्पस ऍक्टीव्हवेअर लिमिटेड (Campus Activewear Ltd) या तीन कंपन्या लवकरच त्यांचा आयपीओ (IPO) बाजारात आणू शकतील.

 IPO
LIC चा मेगा IPO या आर्थिक वर्षात येण्याची शक्यता कमीच; सूत्रांची माहिती

श्रेष्ठा नॅचरल बायोप्रॉ़क्ट्स लिमिटेड (Sresta Natural Bioproducts Ltd)

श्रेष्ठा नॅचरल बायोप्रॉ़क्ट्स लिमिटेड (Sresta Natural Bioproducts Ltd) ही एक सेंद्रिय अन्न उत्पादक कंपनी आहे. ज्यामध्ये प्रायव्हेट इक्विटी फंड पीपुल कॅपिटल आणि व्हेंचर कॅपिटल फर्म व्हेंचरइस्टची (Peepul Capital और venture capital firm VenturEast) गुंतवणूक (Investment) आहे. कंपनीने जानेवारी महिन्यात सेबीकडे आयपीओसाठी अर्ज दाखल केला होता.

श्रेष्ठा नॅचरल बायोप्रॉ़क्ट्स लिमिटेड IPO मध्ये 50 कोटींचा फ्रेश इश्यू असेल तर Peepul Capital Fund III LLC आणि Bio Fund सारखे गुंतवणूकदार 70.3 लाख इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विकतील. कंपनी या IPO मधून मिळणारे उत्पन्न तिच्या वर्किंग कॅपिटलच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, कर्ज फेडण्यासाठी आणि कंपनीच्या इतर कामकाजासाठी वापरेल.

 IPO
LIC चा IPO पुढे ढकलला जाणार नाही? २२ दिवसांमध्ये ड्राफ्टला सेबीची मंजूरी

मैनी प्रिसिजन प्रॉडक्ट्स लिमिटेड (Maini Precision Products Ltd)

मैनी प्रिसिजन प्रॉडक्ट्स लिमिटेड (Maini Precision Products Ltd) प्रोसेस डिझाइन, इंजीनिअरिंग, मॅन्यूफॅक्चरिंग आणि टेस्टिंग या व्यवसायात आहे. कंपनीने डिसेंबर 2021 मध्ये IPO साठी अर्ज दाखल केला होता. मैनी प्रिसिजनच्या IPO मध्ये 150 कोटींचे फ्रेश इश्यू आणि 2.548 कोटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर आहे. या IPO मधून मिळणारी रक्कम कर्ज फेडण्यासाठी वापरली जाईल.

कॅम्पस ऍक्टीव्हवेअर लिमिटेड (Campus Activewear Ltd)

कॅम्पस ऍक्टिव्हवेअर कंपनीने डिसेंबर 2021 मध्ये सेबीकडे IPO ड्राफ्ट पेपर दाखल केला होता. हा आयपीओ पूर्णपणे कंपनीच्या प्रमोटर्स आणि गुंतवणूकदारांच्या ऑफर फॉर सेलवाला आहे. कॅम्पस ऍक्टिव्हवेअर हा भारतातील सर्वात मोठा क्रीडा आणि ऍथलेटिक्स आणि फुटवेअर ब्रँड आहे. कॅम्पस ब्रँड 2005 मध्ये देशात लाँच झाला होता.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com