टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये होऊ शकते नुकसान!

कंपनीने फायलिंगमध्ये ही माहिती दिली आहे.
tata motors
tata motorssakal media
Summary

कंपनीने फायलिंगमध्ये ही माहिती दिली आहे.

Tata Motors : सेमीकंडक्टर कमतरतेमुळे टाटा मोटर्सच्या (Tata Motors) विक्रीवर परिणाम झाला आहे. विशेषत: मागणीनंतर जग्वार (Jaguar) आणि लँड रोव्हर (Land Rover) च्या विक्रीवर परिणाम झाला आहे. चिपच्या तुटवड्यामुळे टाटा मोटर्सच्या किरकोळ विक्रीतही वार्षिक आणि तिमाही आधारावर घट झाली आहे. कंपनीने फायलिंगमध्ये ही माहिती दिली आहे. या अहवालामुळे कंपनीच्या शेअरवर (Shares) परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञ आणि ब्रोकरेज हाऊसचे मत आहे. डिसेंबर तिमाही अपडेटनंतर, ब्रोकरेज हाऊसने स्टॉकमध्ये विक्री करा किंवा न्यूट्रल राहा असे रेटिंग दिले आहे.

tata motors
"टाटा मोटर्स'चा इलेक्‍ट्रिक वाहनांसाठी करार 

ब्रोकरेज हाऊस काय म्हणतंय ?

ब्रोकरेज हाऊस CLSA ने टाटा मोटर्सचे (Tata Motors) शेअर्स विक्री करण्याचा सल्ला दिला आहे. शेअरचे टारगेट 408 रुपये ठेवण्यात आले आहे. बँक ऑफ अमेरिकाने देखील स्टॉकला न्युट्रल रेटिंग दिले आहे आणि टारगेट 525 रुपये ठेवले आहे. बुधवारी शेअर 507 रुपयांवर बंद झाला होता. सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे विक्रीवर परिणाम झाला आहे. भविष्यातही काही परिणाम होऊ शकतो, असे ब्रोकरेज हाऊस सीएलएसएचे म्हणणे आहे. तसेच JLR व्हॉल्यूम आणि प्रॉफिटिबिलिटी सुधारणे बाकी आहे. जेव्हा सेमीकंडक्टर टंचाईची समस्या दूर होईल तेव्हाच पुरवठ्याची अर्थात सप्लाय चांगला होईल. मागणी असली तरी स्टॉक खूपच कमी आहे. चिपची कमतरता भरून काढल्यानंतर JLR व्हॉल्यूममध्ये 20 टक्के CAGR ने सुधारणा होऊ शकते.

tata motors
टाटा मोटर्स करणार रु.500 कोटींच्या कर्जरोख्यांची विक्री

प्रत्येक सेक्टरमध्ये कमी विक्री

टाटा मोटर्सची (Tata Motors) रिटेल सेल्स सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत डिसेंबर तिमाहीत 13.6 टक्क्यांनी घसरून 80,126 युनिट्सवर आली आहे. दुसरीकडे, वार्षिक आधारावर रिटेल सेल्स 37.6 टक्के अर्थात 48,300 युनिट्सची घट झाली आहे. चीन (-6.9टक्के), युरोप (-6.8टक्के), उत्तर अमेरिका (-11.8टक्के), यूके (-24.3टक्के) आणि ओव्हरसीज (-25.4टक्के) प्रत्येक ठिकाणी रिटेल सेल्समध्ये घट झाली आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com