esakal | शेअर बाजार सावरला, दिवसअखेर सेन्सेक्स आणि निफ्टी वधारले
sakal

बोलून बातमी शोधा

Share-Market

आज सकाळच्या सत्रात घसरलेला शेअर बाजार अखेर दिवसअखेर सावरला आहे. दिवसअखेर शेअर बाजार सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ नोंदवत भारतीय शेअर बाजार सकारात्मक व्यवहार करून बंद झाला.  परिणामी सेन्सेक्स २४२.५२ अंशांनी वधारून ३३,७८०.८९ वर बंद झाला. तर ७०.९ अंशांच्या वाढीसह निफ्टी ९९७२.९० वर स्थिरावला.

शेअर बाजार सावरला, दिवसअखेर सेन्सेक्स आणि निफ्टी वधारले

sakal_logo
By
पीटीआय

आज सकाळच्या सत्रात घसरलेला शेअर बाजार अखेर दिवसअखेर सावरला आहे. दिवसअखेर शेअर बाजार सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ नोंदवत भारतीय शेअर बाजार सकारात्मक व्यवहार करून बंद झाला. परिणामी सेन्सेक्स २४२.५२ अंशांनी वधारून ३३,७८०.८९ वर बंद झाला. तर ७०.९ अंशांच्या वाढीसह निफ्टी ९९७२.९० वर स्थिरावला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळच्या सत्रात शेअर बाजारात घसरण झाली होती. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकात घसरण नोंदवण्यात आली होती. मात्र त्यानंतर बाजार सावरला. आंतरराष्ट्रीय पातळीवर आशियाई शेअर बाजारसुद्धा सुरूवातीच्या सत्रात घसरलेला होता, तर अमेरिकन शेअर बाजारातदेखील ७ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली होती. अमेरिकन अर्थव्यवस्था रुळावर येण्यास अपेक्षेपेक्षा जास्त कालावधी लागेल या अमेरिकन फेडरलच्या अंदाजामुळे जगभरातील बाजारावर नकारात्मक परिणाम झाला आहे. मात्र शेअर बाजार सावरण्यातून विकासदर सावरण्यासंदर्भात गुंतवणूकदार आशावादी असल्याचे चित्र दिसते आहे.

पिपल्स कोऑपरेटिव्ह बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेचे निर्बंध

महिंद्रा अँड महिंद्रा, भारती एअरटेल, श्री सिमेंट्स, बजाज फायनान्स, हिरो मोटोकॉर्प या कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत आज ४ ते ७ टक्क्यांपर्यत वाढ नोंदवण्यात आली.

तर झी एंटरटेनमेंट, ओएनजीसी, टेक महिंद्रा, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन, विप्रो या कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत घसरण झाली होती. 

महिंद्रा अँड महिंद्राला ३,२५५ कोटींचा तोटा

रुपया घसरला
आंतरराष्ट्रीय चलन बाजारात रुपया किंचित घसरण नोंदवत ७५.८४ रुपये प्रति डॉलरच्या पातळीवर होता.

* सेन्सेक्स ३३,७८० अंशांच्या पातळीवर
* निफ्टी ९,९७२ अंशांच्या पातळीवर 
* निफ्टीमध्ये ७० अंशांची वाढ
* सेन्सेक्समध्ये २४२ अंशांची वाढ
 

महागाईची आकडेवारी जुलैपर्यंत जाहीर न करण्याचा प्रस्ताव