आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार सावरला, 'या' पाच मोठ्या शेअर्समध्ये तेजी

दिवसभराच्या अस्थिरतेनंतर शेअर बाजार तेजीसब बंद झाला.
share market update
share market updategoogle

Share Market Update: आज शेअर बाजार हलक्या तेजीने सुरू झाला. आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने आज बाजारात दबाव दिसून आला तर गुंतवणूकदारांमध्येही धाकधूक कायम होती. मात्र दिवसभराच्या अस्थिरतेनंतर शेअर बाजार तेजीसह बंद झाला. (Share Market news today)

सेन्सेक्स 344 अंकाच्या तेजीसह 53,760 वर बंद झाला तर निफ्टी 110 अंकाच्या तेजीसह 16,050 वर बंद झाला. आज शेअर बाजारात आयटी आणि बँकीग शेअर्सवर दबाव कायम होता. अखेर बाजारात 35 शेअर्स वर आले तर 15 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. (share market closing update 15 july 2022)

share market update
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार सावरला, 'या' पाच मोठ्या शेअर्समध्ये तेजी

पहिल्या सत्रात सेन्सेक्स 300 अंकांच्या तेजीसह 53,720 वर सुरू झाला तर निफ्टी 80 अंकाच्या तेजीसह 16,020वर सुरू झाला होता.

गुरुवारी मात्र बाजारात प्रचंड अस्थिरता दिसून आली होती. सेन्सेक्स 98 अंकांनी घसरून 53416 वर आणि निफ्टी 28 अंकांनी घसरून 15939 वर बंद झाला. निफ्टी बँक 177 अंकांनी घसरून 34,651 वर बंद झाला. तर मिडकॅप 24 अंकांनी घसरून 27,804 वर बंद झाला.

share market update
Twitter Down : जगभरातील यूजर्संकडून सोशल मीडियावर तक्रार

आज शेअर बाजारात TCS,ICICIBANK,ONGC,INDUSINDBK, AXISBANK, WIPRO, TATASTEEL, HCLTECH सारख्या मोठ्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर TATAMOTORS, HINDUNILVR, MARUTI, COALINDIA, HDFC सारख्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

अपेक्षेपेक्षा जास्त अमेरिकी चलनवाढीचे आकडे बाजारात येण्याची भीती होती, ज्याचा परिणाम स्पष्ट दिसून आला. जरी आता बाजारात तेजी दिसत असेल तरी गुंतवणूकदारांमधील धाकधूक कायम राहणार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com