Share Market Closing : शेअर बाजारात घसरण; 'या' बँकांच्या शेअर्सचे मोठे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market Closing : शेअर बाजारात घसरण; 'या' बँकांच्या शेअर्सचे मोठे नुकसान

Share Market Closing : भारतीय शेअर बाजारासाठी बुधवारचा दिवस अत्यंत निराशाजनक ठरला आहे. गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे.

बाजारातील घसरणीत बँकिंग समभागांचा मोठा हात आहे. बँक निफ्टी 1,000 अंकांपेक्षा जास्त 2.54 टक्क्यांनी घसरला आहे.

BSE India

BSE India

आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 774 अंकांनी घसरून 60,205 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 226 अंकांनी किंवा 1.25 टक्क्यांनी घसरून 18000 च्या खाली 17,891 अंकांवर बंद झाला.

हेही वाचा: Budget 2023 : पुन्हा महागाई वाढणार? तब्बल 35 वस्तुंवरील कस्टम ड्युटीत होऊ शकते वाढ

आजच्या घसरणीत गुंतवणूकदारांचे 3.5 लाख कोटी बुडाले. BSE लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 276.89 लाख कोटी रुपयांवर घसरले. बँक निर्देशांकात सर्वाधिक घसरण झाली.

स्टेट बँक, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँक सेन्सेक्समध्ये सर्वाधिक घसरले. हिंदुस्तान युनिलिव्हर, मारुती सुझुकी आणि टाटा स्टील दिवसभरात सर्वाधिक तेजीत होते.

हेही वाचा : 'नाटू नाटू..'ला मिळाला पुरस्कार..पण पुढे काय?

बाजारात मंदीच्या वादळातून कोणतेही क्षेत्र वाचले नाही. बँकिंग, आयटी, फार्मा, मेटल, एनर्जी, एफएमसीजी, कंझ्युमर ड्युरेबल्स, इन्फ्रा यांसारख्या सर्व क्षेत्रांचे शेअर्स बंद झाले.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागातही घसरण झाली. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी केवळ 8 समभाग वाढीसह बंद झाले, तर उर्वरित 22 समभाग घसरले. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 10 वाढीसह आणि 40 तोट्यासह बंद झाले.

केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 बाबत अनिश्चितता, परकीय गुंतवणूकदारांची सततची विक्री, जागतिक विकासदर मंदावण्याची भीती, इत्यादी कारणे शेअर बाजारातील आजच्या घसरणीमागे होती.