Share: 'ही' कंपनी गुंतवणुकदारांना देणार एका शेअरवर तीन बोनस शेअर्स गिफ्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market

Share: 'ही' कंपनी गुंतवणुकदारांना देणार एका शेअरवर तीन बोनस शेअर्स गिफ्ट

शेअर बाजारात लिस्टेड इझी ट्रिप प्लॅनर्स (Easy Trip Planners) आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सची भेट देणार आहे.  कंपनीने 3:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स मंजूर केल्याचे कंपनीने बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या फायलिंगमध्ये म्हटले आहे. म्हणजेच या कंपनीच्या गुंतवणूकदारांना 1 शेअरवर बोनस म्हणून 3 शेअर्स दिले जातील. याशिवाय, कंपनीने 1:2 च्या प्रमाणात स्टॉक स्प्लिटलाही मान्यता दिली आहे.

हेही वाचा: Stock : बँकिंग स्टॉक येत्या काळात देईल 56% नफा, आता गुंतवणूकीची चांगली संधी...

10 ऑक्टोबर 2022 रोजी बोर्डाची बैठक झाली. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने 2 रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या प्रत्येक इक्विटी शेअरचे 1 रुपयाच्या फेस व्हॅल्यूच्या दोन इक्विटी शेअर्समध्ये विभाजन करण्यास मान्यता दिली आहे. कंपनीने सोमवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला ही माहिती दिली.

याशिवाय कंपनीकडून प्रत्येक इक्विटी शेअरसाठी 3 बोनस शेअर्स जारी केले जातील. हे बोनस शेअर्स बोर्डाच्या मंजुरीनंतर 2 महिन्यांच्या आत गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा केले जातील. ऑथराइज्ड शेअर कॅपिटल वाढवण्यावरही कंपनी भर देणार आहे.

हेही वाचा: Stock: 'या' सरकारी कंपनीने गुंतवणूकदारांना बनविले कोट्यधीश, 1 लाखाचे केले 2.77 कोटी

1 वर्षात 38% रिटर्न
इझी ट्रिप प्लॅनर्सच्या (Easy Trip Planners) शेअर्सनी गेल्या 19 महिन्यांत त्याच्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा दिला आहे. कंपनीचे शेअर्स 19 मार्च 2021 ला बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये 104.15 रुपयांवर व्यवहार करत होते आणि 10 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीच्या शेअर्सची किंमत 406.70 रुपये होती. यावर्षी कंपनीने त्यांच्या गुंतवणुकदारांना 52 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे आणि गेल्या 1 वर्षापासून आतापर्यंत कंपनीने 38 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.