
गुंतवणूकदारांना दिलासा, सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी
आठवड्याच्या सुरवातीला शेअर बाजारात तेजी दिसून आली. सोमवारी शेअर बाजार तेजीसह बंद झाला. आज सुद्धा शेअर बाजारात पहिल्याच सत्राची तेजीने सुरवात झाली. सेन्सेक्स 250 अंकांनी 53,480 वर सुरू झाला तर निफ्टी 64 अंकानी 15,900 वर सुरू झाला. आज बाजार जरी तेजीने सुरू झाला तरी दिवसभर गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक कायम राहील.
हेही वाचा: Gold-Silver Price: सोने-चांदीचे दर आजही स्थिर; खरेदीची उत्तम वेळ
सोमवारी शेअर बाजार वाढीसह अर्थात बंद झाला होता. एफएमसीजी आणि फायनान्शियल शेअर्सकडून बाजाराला चांगला सपौर्ट मिळाला. सेन्सेक्स 326.84 अंकांच्या अर्थात 0.62 टक्क्यांच्या वाढीसह 53,234.77 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 83.30 अंक म्हणजेच 0.53 टक्क्यांच्या वाढीसह 15,835.35 वर बंद झाला.
हेही वाचा: पॅरासिटामॉल-कॅफिनची गोळी आता मिळणार अवघ्या २.८८ रुपयांना !
बॅकिंग स्टॉककडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे बाजाराला सुरुवातीचा नफा पुढे नेण्यात यश आल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. बँकिंग सेक्टरचा प्रोव्हिजनल डेटा पहिल्या तिमाहीत क्रेडिट ग्रोथमध्ये मजबूती दिसल्याचे दाखवते. जसजसे तिमाही निकालाकडे वाटचाल करत आहोत, तसतसे बाजाराचे लक्ष आता कंपनीच्या निकालांवर आणि नवीन आर्थिक वर्षासाठी मॅनेजमेंटच्या गायडन्सवर असेल.
हेही वाचा: शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स आणि निफ्टी वधारला
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)
इंडसइंड बँक (INDUSINDBK)
ब्रिटानिया (BRITANNIA)
आयटीसी (ITC)
आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)
आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)
ऍस्ट्रल (ASTRAL)
ट्रेंट (TRENT)
टाटा पॉवर (TATAPOWER)
भारतीय कंटेनर निगम लिमिटेड (CONCOR)
Web Title: Share Market Opening Update 5 July 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..