
Share Market: शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स ८५० अंकांनी कोसळला
आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण दिसून आली. सुरवातीलाच सेन्सेक्स 846.86 अंकांनी घसरला तर निफ्टी 16,250 च्या खाली गेली आहे.
शुक्रवारी सुद्धा शेअर बाजार कोसळला होता. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक कोसळले होते. सेन्सेक्स (Sensex) 866.65 अंकांनी म्हणजेच 1.56 टक्क्यांनी वधारून 54835.58 वर बंद झाला होता तर निफ्टी (Nifty) 271.40 अंकांनी म्हणजेच 1.63 टक्क्यांनी वधारून 16,411.25वर बंद झाली होती.
हेही वाचा: LIC IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा आजचा शेवटचा दिवस
आरबीआयने व्याजदरात अचानक वाढ केल्यानंतर मागील आठवड्यापासून सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. दरम्यान, यूएस फेडने व्याजदरात 0.50 टक्के वाढ जाहीर केल्यानंतर जागतिक बाजाराला काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. मात्र मागील आठवड्याच्या शेवटच्या काही दिवसापासून शेअर बाजारात पडझड दिसून येत आहे.
हेही वाचा: शेअर बाजार सुरू होण्यापूर्वी एक नजर टाका आज परफॉर्म करणाऱ्या 10 शेअर्सवर
LIC IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा आज शेवटचा दिवस
देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. LIC चा IPO आज म्हणजेच सोमवारी बंद होत आहे. 4 मे रोजी IPO ची सुरवात झाली होती. विशेष म्हणजे शनिवारी आणि रविवारी देखील बोली घेण्यात आली. देशातील आयपीओ मार्केटमध्ये एखाद्या कंपनीचा आयपीओ सहा दिवस सुरू असल्याची कदाचित ही पहिलीच वेळ म्हणता येईल. रविवारपर्यंत 1.79 पट LIC IPO सबस्क्रिप्शन मिळाले. तुम्ही अजून यात गुंतवणूक केली नसेल तर आज तुमच्याकडे शेवटची संधी आहे
Web Title: Share Market Opening Update
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..