
शेअर बाजार सुरू होण्यापूर्वी एक नजर टाका आज परफॉर्म करणाऱ्या 10 शेअर्सवर
शुक्रवारी कमोजर जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजार 1.5 टक्क्यांनीे घसरला. जगभरातील सर्व मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वाढवण्याचाी सुरुवात केल्याने जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे, ज्याचा शेअर बाजारावर परिणाम होत आहे. शेवटी सेन्सेक्स 866.65 अंकांनी म्हणजेच 1.56 टक्क्यांनी घसरून 54,835.58 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 271.40 अंकांनी अर्थात 1.63 टक्क्यांनी घसरून 16,411.25 वर बंद झाला.
हेही वाचा: ‘एलआयसी’च्या ‘आयपीओ’चा बोलबाला
महागाई नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदरात आक्रमक वाढ केल्यामुळे जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. दरम्यान, बँक ऑफ इंग्लंडने व्याजदरात वाढ करताना संभाव्य मंदीच्या धोक्याचा इशाराही दिला असून त्यामुळे गुंतवणूकदारांची भीती वाढली आहे.
बाजारातील अस्थिरतेचा हा काळ स्मार्ट गुंतवणूकदारांसाठी चांगला असल्याचे विनोद नायर म्हणाले. गुंतवणूकदारांनी अशा सेक्टर्सवर लक्ष केंद्रित केले पाहिजे ज्यावर वाढती महागाई आणि बाँड यील्डचा कमीत कमी परिणाम होईल असेही ते म्हणाले.
हेही वाचा: आता हंगाम विलीनीकरणाचा!
आज कशी असेल बाजाराची स्थिती ?
रिलायन्सच्या निकालांवर बाजार आज रिऍक्ट करेल. यानंतर जागतिक संकेतांवर बाजाराची नजर असेल. यूएस फेडने व्याजदरात केलेल्या वाढीमुळे भारतासह जगभरातील गुंतवणूकदार नाराज झाले आहेत. निफ्टीने 16,400 च्या महत्त्वपूर्ण सपोर्टची टेस्ट केली आहे. बाजारात तेजी आल्यास निफ्टीला 16,650-16,800 च्या झोनमध्ये रझिस्टंसचा सामना करावा लागेल.
व्याजदरांबाबत आरबीआय आणि जगातील इतर देशांची आक्रमक भूमिका पाहता बाजार सावध दिसत असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले म्हणाले. याशिवाय कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि महागाई वाढण्याची भीती त्यांच्यापुढील मोठे आव्हान आहे. निफ्टीने विकली चार्टवर लाँग बियरीश कँडल तयार केली आहे जी आणखी कमजोरीचे लक्षण आहे. दुसरीकडे, निफ्टीने इंट्राडे चार्टवर सतत लोअर टॉप फॉर्मेशन होल्ड केली आहे. हे देखील शॉर्ट टर्ममध्ये कमकुवतपणाचे लक्षण आहे.
हेही वाचा: प्राप्तिकर विवरणपत्रासाठी नवे अतिरिक्त निकष
आजचे टॉप 10 परफॉर्म करु शकणारे शेअर्स कोणते ?
हिरो मोटोकॉर्प (HEROMOTOCORP)
टेक महिंद्रा (TECHM)
पॉवर ग्रीड (POWERGRID)
आयटीसी (ITC)
ओएनजीसी (ONGC)
व्होल्टास(VOLTAS)
ट्रेंट (TRENT)
अस्ट्रल (ASTRAL)
एल अँड टी (LTTS)
बाळकृष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
Web Title: Share Market Pre Analysis Best Stock To Buy Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..