Share Market : शेअर बाजार सुरु होण्यापुर्वी एक नजर टाका आजच्या टॉप 10 शेअर्सवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market
Share Market : शेअर बाजार सुरु होण्यापुर्वी एक नजर टाका आजच्या टॉप 10 शेअर्सवर

शेअर बाजार सुरु होण्यापुर्वी एक नजर टाका आजच्या टॉप 10 शेअर्सवर

Share Market Update: 29 एप्रिलला संपलेल्या आठवड्यात सेन्सेक्स 136.28 अंकांनी अर्थात 0.23 टक्क्यांनी घसरून 57,060.87 वर बंद झाला. निफ्टी 69.45 अंकांनी म्हणजेच 0.40 टक्क्यांनी घसरून 17,102.5 वर बंद झाला. निफ्टी मीडिया 6 टक्क्यांनी, ऑईल अँड गॅस 2.6 टक्क्यांनी आणि आयटी इंडेक्स 2.5 टक्क्यांनी घसरला. निफ्टीचा एफएमसीजी इंडेक्स 1 टक्क्यांनी वाढला.

बीएसई मिडकॅप इंडेक्स 1.1 टक्क्यांनी घसरला, स्मॉलकॅप इंडेक्स 2 टक्के आणि लार्जकॅप इंडेक्स 0.45 टक्क्यांनी घसरला. एप्रिलमध्ये भारतीय बाजार 2 टक्क्यांनी घसरला. जागतिक आणि देशांतर्गत चिंतेमुळे अस्थिरता दिसून आली. यूएस फेडरल रिझव्‍‌र्हने केलेली आक्रमक दरवाढ, बॉन्ड यील्ड आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ, रशिया-युक्रेन युद्ध, भारतीय कंपन्यांचे मिश्र तिमाही निकाल आणि FII कडून सुरू असलेली विक्री यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत.

हेही वाचा: Share Market: सेन्सेक्स 460 तर निफ्टी 142 अंकांनी घसरला; AXISBANK, COALINDIA शेअर्समध्ये घसरण

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) गेल्या आठवड्यात 11,446.52 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DIIs) 9,703.04 कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. गेल्या आठवड्यात 46 मिडकॅप शेअर्सच10 ते 54 टक्क्यांनी घसरले.

निफ्टी दोन आठवड्यांसाठी 16,900-17,350 च्या रेंजमध्ये व्यवहार करत असल्याचे सॅमको सिक्युरिटीजच्या येशा शाह यांचे म्हणणे आहे. 16,800 जवळ एक महत्त्वाचा सपोर्ट झोन दिसत आहे. बेंचमार्क इंडेक्स पुन्हा अनेक वेळा या पातळीच्या वर चढला आहे.विकलीचार्टवर, गेल्या आठवड्यात डोजी कँडल तयार केल्यानंतर निफ्टीने या आठवड्यात इन्वर्टेड हॅमर तयार केला. हा तेजीचा सिग्नल आहे. त्यामुळे, पुढील काही आठवड्यांसाठी 18,000 च्या टारगेटसह इंडेक्सवर तेजीचा कल कायम ठेवण्याची शिफारस करत असल्याचेही ते म्हणाले.

तांत्रिकदृष्ट्या बाजार हायर बॉटम फॉर्मेशनला होल्ड केल्याचे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवलेंनी म्हटले. बाजारातील विक्री अल्पकालीन करेक्शन दाखवत आहे कारण बाजार अस्थिर आणि दिशाहीन आहे. बुल्ससाठी, 200-डे SMA किंवा 17,300 पातळी रझिस्टंस म्हणून काम करत आहे. यावर निफ्टी 17,400-17,550 पर्यंत जाऊ शकतो. दुसरीकडे, 17,000 आणि 50-डे SMA हे निफ्टीसाठी दोन सपोर्ट लेव्हल आहे. दुसरीकडे, आणखी एक सुधारणा 17k च्या खाली 16,900-16,800 पर्यंत दिसू शकते असेही आठवलेंनी म्हणाले.

हेही वाचा: या' शेअर्सचा 1 वर्षात 350% परतावा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)

टाटा कंझ्युमर (TATACONSUM)

कोटक बँक (KOTAKBANK)

सन फार्मा (SUNPHARMA)

एचडीएफसी बँक (HDFCBANK)

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)

लॉरस लॅब (LAURUSLAB)

एमफॅसिस (MPHASIS)

एमआरएफ (MRF)

पर्सिस्टंट (PERSISTENT)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Share Market Pre Analysis 2nd May 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top