या' शेअर्सचा 1 वर्षात 350% परतावा, तुमच्याकडे आहे का स्टॉक? | Taneja Aerospace & Aviation Ltd | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Taneja Aerospace & Aviation Ltd
या' शेअर्सचा 1 वर्षात 350% परतावा, तुमच्याकडे आहे का स्टॉक? | Taneja Aerospace & Aviation Ltd

या' शेअर्सचा 1 वर्षात 350% परतावा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?

तनेजा एअरोस्पेस अँड एव्हिएशन लिमिटेड (Taneja Aerospace & Aviation Ltd) 2021 च्या मल्टीबॅगर शेअर्सपैकी एक आहे. या स्टॉकमध्ये जानेवारी ते मार्च 2022 या तिमाहीत स्मॉल कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे मास्टर पोरिंजू वेलियाथने स्टेक वाढवला आहे. Q4FY22 मध्ये एअरलाइनमधील त्यांचा हिस्सा 1.07 टक्क्यांवरून 1.20 टक्क्यांनी वाढवला आहे.

2022 मध्ये, पोरिंजू वेलियाथच्या पोर्टफोलिओचा हा शेअर कंसोलिडेशन झोनमध्ये राहिला आहे. या शेअरने वार्षिक आधारावर केवळ 8 टक्के परतावा दिला आहे. मात्र, पोरिंजू वेलियाथने स्टॉकमधील आपली हिस्सेदारी वाढवल्याची बातमी समोर आल्यानंतर या शेअर्समधील बुल्सचे आकर्षण वाढले. गेल्या एका महिन्यात त्यात जवळपास 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हेही वाचा: 'हा' मल्टीबॅगर स्टॉक फक्त एका महिन्यात 40% वाढला, आणखी तेजी येण्याची शक्यता

मिंटच्या बातमीनुसार, गेल्या 6 महिन्यांत हा स्टॉक सुमारे 83 रुपयांवरून 137 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत त्यात सुमारे 65 टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात हा स्टॉक 31.35 रुपयांवरून 137 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत त्यात 350 टक्के वाढ झाली आहे.

तनेजा एअरोस्पेसच्या Q4 FY2021-22 शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, पोरिंजू वेलियाथचे त्यात 3,00,000 शेअर्स आहेत. हे भांडवल कंपनीच्या एकूण पेड-अप कॅपिटलच्या 1.20 टक्के आहे. Q3FY22 मध्ये, पोरिंजू वेलियाथ यांच्याकडे कंपनीचे 2,68,000 शेअर्स अर्थात 1.07 टक्के हिस्सा होता. याचा अर्थ पोरिंजू वेलियाथने जानेवारी-मार्च 2022 या तिमाहीत कंपनीचे 32,000 नवीन शेअर्स अर्थात 0.13 टक्के शेअर्स खरेदी केलेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Taneja Aerospace Aviation Ltd Share Market Investment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top