आज कसा असेल शेअर बाजाराचा मूड, हे शेअर्स करतील परफॉर्म

वाढती महागाई आणि विक्रीचा दबाव यामुळे बाजार सलग पाचव्या दिवशी लाल चिन्हात बंद झाला.
Best Stocks to Buy Today
Best Stocks to Buy TodaySakal

Best Stock to Buy: गुरुवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. वाढती महागाई आणि विक्रीचा दबाव यामुळे बाजार सलग पाचव्या दिवशी लाल चिन्हात बंद झाला. शेवटी सेन्सेक्स 1,158 अंकांनी म्हणजेच 2.14 टक्क्यांनी घसरून 52,930.31 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 359.10 अंकांनी म्हणजेच 2.22 टक्क्यांनी घसरून 15,808 वर बंद झाला.

कमकुवत जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजार कमजोरीसह खुले झाल्याचे आनंद राठीचे नरेंद्र सोलंकी म्हणाले. अमेरिकेतील महागाईच्या वाढत्या आकडेवारीचा जागतिक बाजारावर परिणाम दिसून आला आहे. दिवसभर जसजसा व्यवहार पुढे सरकत गेला तसतशी बाजारातील कमजोरी वाढत गेली. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर जूनच्या पॉलिसी मीटिंगमध्ये आरबीआयने दर आणखी वाढवल्याच्या बातम्यांमुळे बाजारातील व्यापारी सावध असल्याचे दिसून आले असेही सोलंकी म्हणाले.

Best Stocks to Buy Today
या स्टॉकचा 6 महिन्यांत 1700 टक्के परतावा; गुंतवणूकदार मालामाल

आज बाजार कसा चालेल?

कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजारावर दबाव कायम असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे सहज अग्रवाल म्हणाले. निफ्टीसाठी 16400 वर मोठा रझिस्टंस आहे. निफ्टीसाठी मीडियम टर्म ट्रेंड सपोर्ट 15500 वर आहे. तो खाली तुटला तर निफ्टी शॉर्ट टर्ममध्ये आणखी घसरेल.

आता शुक्रवारी म्हणजेच आजच्या व्यापारात बाजार सुरुवातीच्या व्यापारात IIP आणि CPI डेटावर प्रतिक्रिया देईल. जूनमध्ये होणाऱ्या आरबीआयच्या पुढील धोरणात्मक बैठकीवर या आकडेवारीचा परिणाम दिसून येईल. याशिवाय जागतिक संकेतांवरही बाजाराची नजर असेल.

Best Stocks to Buy Today
LIC IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा आजचा शेवटचा दिवस

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

विप्रो (WIPRO)

आयशर मोटर्स (EICHERMOTORS)

एचसीएल टेक (HCLTECH)

टीसीएस (TCS)

डॉ. रेड्डी (DRREDDY)

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFINLTD)

आयआरसीटीसी (IRCTC)

आयडीएफसी फर्स्ट बँक ( IDFCFIRSTBANK)

गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

एमफॅसिस (MPHASIS)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com