आज कशी असेल शेअर बाजारातील स्थिती; कोणते 10 शेअर्स करतील बेस्ट परफॉर्म?

सोमवारी सेन्सेक्स-निफ्टी सोमवारी हलक्या घसरणीसह बंद झाले.
Share Market Update | Stock Market Tips
Share Market Update | Stock Market Tipssakal

सोमवारी सेन्सेक्स-निफ्टी सोमवारी हलक्या घसरणीसह बंद झाले. सरकारने लोहखनिज आणि काही पोलाद मध्यस्थांवर निर्यात शुल्क (Export Duty) लादल्यानंतर, मेटल शेअर्सची विक्री झाली. शेवटी सेन्सेक्स 37.78 अंकांनी म्हणजेच 0.07 टक्क्यांनी घसरून 54,288.61वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 51.45 अंकांनी किंवा 0.32 टक्क्यांनी घसरून 16,214.70 वर बंद झाला.
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आणि त्यामुळे होणाऱ्या चलनवाढीचा दबाव गुंतवणूकदार आणि व्यापार्‍यांवर परिणाम करत असल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे एस रंगनाथन म्हणाले. महागाईचा सामना करण्यासाठी भारत सरकारकडून बाजारातून अतिरिक्त कर्ज घेण्याची शक्यताही बाजारावर दबाव आणत असल्याचे ते म्हणाले.

Share Market Update | Stock Market Tips
Share Market: सेन्सेक्स 100 अंकांनी वधारला, निफ्टी 16300वर सुरु; M&M, टायटनचे शेअर्स वधारले

आज कशी असेल बाजारातील स्थिती ?
सोमवारी मेटल शेअर्सना सर्वाधिक फटका बसल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. याशिवाय ऑटो मोबाईल, रियल्टी, ऑइल आणि गॅसवरही दबाव दिसून आला. त्यामुळे सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद झाले. तांत्रिक दृष्टिकोनातून, निफ्टीने इंट्राडे चार्टवर डबल टॉप फॉर्मेशन तयार केले आहे. त्याचप्रमाणे, त्याने डेली चार्टवर हॅमर कॅंडलस्टिक फॉर्मेशन तयार केले आहे जे मोठ्या प्रमाणात नकारात्मक आहे.
16,200 पातळी ड्रे ट्रेडर्ससाठी सपोर्ट लेव्हल म्हणून काम करेल. जर निफ्टी याच्या खाली घसरला, तर तो 16,100-16,050 च्या दिशेने जाऊ शकतो. दुसरीकडे, जर निफ्टी 16,200 च्या वर गेल्यास 16,300 चे इंट्राडे ब्रेकआउट त्याच्यासाठी खूप महत्वाचे असेल. वरच्या बाजूने 16300 ची पातळी तोडली तर निफ्टी 16,400-16,475 च्या दिशेने जाताना दिसेल.

Share Market Update | Stock Market Tips
म्युच्युअल फंडात 100 रुपयांसह सुरु करा गुंतवणूक, देईल चांगला परतावा...

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
डॉ. रेड्डी (DRREDDY)
रिलायन्स (RELIANCE)
अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
जेएसडब्ल्यब स्टील (JSWSTEEL)
टाटा मोटर्स (TATAMOTORS)
ऑरो फार्मा (AUROPHARMA)
अशोक लेलँड (ASHOKLEY)
ट्रेंट (TRENT)
ए यू बँक (AUBANK)
भारत इलेक्ट्रीकल लिमिटेड (BEL)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com