शेअर बाजार : आधी तेजी, मग घसरण

वृत्तसंस्था
Tuesday, 9 June 2020

गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळच्या सत्रात 350 अंशांनी वधारला होता. तर निफ्टीसुद्धा 100 पेक्षा जास्त अंशांनी वधारला होता.  मात्र नफावसुलीमुळे बाजारात घसरण झाली. सध्या सेन्सेक्स 472 अंशांच्या घसरणीसह 33,902 पातळीवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टीमध्ये 138 अंशांची घसरण नोंदवत 10,033 अंशांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे.

आज भारतीय शेअर बाजारात सकाळच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चांगली वाढ झाली होती.गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळच्या सत्रात 350 अंशांनी वधारला होता. तर निफ्टीसुद्धा 100 पेक्षा जास्त अंशांनी वधारला होता.  मात्र नफावसुलीमुळे बाजारात घसरण झाली. सध्या सेन्सेक्स 472 अंशांच्या घसरणीसह 33,902 पातळीवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टीमध्ये 138 अंशांची घसरण नोंदवत 10,033 अंशांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे.

सोन्यातील गुंतवणूक, एक सोनेरी पर्याय

जागतिक पातळीवर अर्थव्यवस्था सावरत असल्याचे चित्र आहे. परिणामी जागतिक पातळीवरून मिळणाऱ्या सकारात्मक संकेतांमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र आज गुंतवणूकदारांनी नफावसूली केल्याचे चित्र बघायला मिळाले.

सरलेल्या आठवड्यात अमेरिकेतून रोजगाराबाबत सकारात्मक आकडेवारी समोर आली. अमेरिकेत बेरोजगारी कमी झाली झाल्याने जगभरातील प्रमुख भांडवली बाजार सकारात्मक सुरुवात झाली. 

 टाटा समूहाची, व्होल्टास लि. उभारणार दक्षिण भारतात नवा प्रकल्प

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. मात्र देशात दीर्घकालीन लॉकडाउन केल्यामुळे अर्थचक्र मंदावले आहे. परिणामी येत्या तिमाहीत कंपन्यांच्या महसुलात मोठी घट होण्याची शक्यता आहे. शिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या  महसुलात मोठी घसरण झाली. यामुळे केंद्र सरकारने पुढील वर्षापर्यंत नव्या कोणत्याही योजना आणणार नसल्याचे जाहीर केले आहे. 

निफ्टी बँकसह अनेक निर्देशांकात घसरण झाली आहे. बँका आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. इंडसइंड बँकवगळता बहुतांश बँकांच्या शेअरच्या किंमतीत घसरण झाली आहे. एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक, स्टेट बँक यांच्या शेअरच्या किंमतीत घसरण झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कच्चे तेल
कच्च्या तेलाच्या किंमतीत काहीशी घसरण झाली आहे.एमसीएक्सवर कच्चे तेल 2826 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करते आहे.

तर डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 0.07 रुपयांनी वधारला आहे. आंतरराष्ट्रीय चलन बाजारात  डॉलरच्या तुलनेत रुपया 75.61 रुपये प्रति डॉलरवर व्यवहार करतो आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Share market takes a dip after early gain