लिस्ट झाल्यानंतर या स्टॉकने दिला केवळ 2 महिन्यांत 421% परतावा

गेल्या दोन महिन्यांत या शेअर्सच्या किंमतीत सुमारे 421.43 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Share Market Updates | Stock Market News
Share Market Updates | Stock Market Newssakal
Updated on

शेअर बाजारातील फक्त काही मोजक्या कंपन्या अशा आहेत, ज्यांनी लिस्ट झाल्यानंतर केवळ 2 महिन्यांतच गुंतवणूकदारांची संपत्ती 5 पटीने वाढवली. जयंत इन्फ्राटेक (Jayant Infratech) हा असाच एक मल्टीबॅगर स्टॉक आहे, ज्याने गेल्या दोन महिन्यांत लिस्ट झाल्यापासून गुंतवणूकदारांना सुमारे 421 टक्के परतावा दिला आहे.

13 जुलै 2022 ला जयंत इन्फ्राटेकचे शेअर्स (Jayant Infratech) बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर (BSE) लिस्ट झाले. लिस्टिंगच्या दिवशी त्याच्या शेअर्सची किंमत 79.80 रुपये होती, जी आता 416.10 रुपये झाली आहे. म्हणजेच गेल्या दोन महिन्यांत या शेअर्सच्या किंमतीत सुमारे 421.43 टक्क्यांनी वाढ झाली आहे. (share market this newly coming stock has given best return in just two months)

Share Market Updates | Stock Market News
Share Market: शेअर बाजारात मोठी उसळण; Sensex 1,564 वर तर Nifty 446

जयंत इन्फ्राटेकच्या (Jayant Infratech) शेअर्समध्ये गेल्या एका महिन्यात 55.73 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पण, गेल्या 5 व्यापार दिवसांत त्याचे शेअर्स 7.53 टक्क्यांनी घसरलेत. बुधवारी, 14 सप्टेंबरला त्याचे शेअर्स बीएसईवर लोअर सर्किटवर गेले आणि जवळपास 5 टक्क्यांनी घसरून 416.10 रुपयांवर बंद झाले.

जयंत इन्फ्राटेक (Jayant Infratech) ही 134.63 कोटी रुपयांची बाजारपेठ असलेली स्मॉल कॅप कंपनी आहे. त्याचे शेअर्स फक्त बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर  (BSE) लिस्टेड आहेत आणि एसएमई वसेगमेंटअंतर्गत 'M' ग्रुपमध्ये व्यवहार करतात.

Share Market Updates | Stock Market News
Stock: एक लाखाचे साडेतीन कोटी! तुम्हाला माहितेय का 'हा' केमिकल स्टॉक…

जयंत इन्फ्राटेकला इसीआय इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन लिमिटेड आणि श्री इलेक्ट्रिकल्स इंजिनियर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त उपक्रमातून सुमारे 54 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाल्याचे स्टॉक एक्स्चेंजला पाठवलेल्या अधिसूचनेत समजले. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागबीर ते इटारी विभागातील रेल्वे विद्युतीकरणासाठी कंपनीला ही ऑर्डर मिळाली आहे.

जयंत इन्फ्राटेकची स्थापना 2003 मध्ये झाली. ही एक तंत्रज्ञान आधारित कंपनी आहे, जी रेल्वे विद्युतीकरण आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या व्यवसायात आहे. कंपनीच्या मुख्य व्यवसायात नवीन आणि विद्यमान रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण समाविष्ट आहे.

Share Market Updates | Stock Market News
Stock: 'या' मल्टीबॅगर हॉटेल स्टॉकचा एका वर्षात 104% परतावा

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com