Share Market: शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स 537 अंकांनी घसरला, निफ्टी 17,038वर बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market Latest News Updates
Share Market: शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स 537 अंकांनी घसरला, निफ्टी 17,038वर बंद

Share Market: शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स 537 अंकांनी घसरला, निफ्टी 17,038वर बंद

Share Market Updates: एक आठवडाभर झालेल्या सातत्यपूर्ण घसरणीनंतर काल शेअर बाजारात तेजी दिसून आली होती, मात्र आज पुन्हा शेअर बाजार गडगडला. मंथली एक्सपायरीच्या आदल्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांंमध्ये पडझड झाली. आज शेअर बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 537.22 अंकांनी म्हणजेच 0.94 टक्क्यांनी घसरून 56,819.39 वर बंद झाला तर निफ्टी 162.40 अंकांनी म्हणजेच 0.94 टक्क्यांनी घसरून 17,038.40 वर बंद झाला. निफ्टी 50 मधील केवळ 10 शेअर्समध्ये आज वाढ झाल्याचे दिसून आली तर 39 शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली तर एका शेअरमध्ये कोणतीही वाढ अथवा घट नोंदवली गेली नाही. (Share Market Latest News Updates)

हेही वाचा: महिंद्रा अँड महिंद्राचे (M&M) शेअर्स करणार मालामाल; 72 टक्के वाढीचा तज्ञांचा अंदाज

तत्पूर्वी एक आठवडाभर झालेल्या सातत्यपूर्ण घसरणीनंतर काल शेअर बाजारात तेजी दिसून आली होती, मात्र आजच्या दिवसाची सुरुवात पुन्हा घसरणीने झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी आज गॅप डाऊन ओपनिंग दिलं. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स 372.93 अंकांनी घसरून 56,983.68 वर सुरु झाला तर निफ्टी 127.45 अंकांनी घसरून 17,073.35वर सुरु झाला. निफ्टी 50 मधील केवळ 6 शेअर्समध्ये आज वाढ झाल्याचे दिसून आली तर 44 शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली.

हेही वाचा: Share Market: आज कोणते शेअर करतील मालामाल? या 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

तत्पूर्वी काल मंगळवारी 2 दिवसांनंतर शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स 776 अंकांनी वाढला, तर निफ्टी 17200 च्या पातळीवर बंद झाला, बीएसईचे सर्व सेक्टरल इंडेक्स तेजीत होते. दुसरीकडे, निफ्टी 246.85 अंकांच्या अर्थात 1.46 टक्क्यांच्या वाढीसह 17,200.80 वर बंद झाला.

मंगळवारी ऑटो, रियल्टी, एफएमसीजी सेक्टर्समध्ये खरेदी दिसून आली. फार्मा, पीएसई शेअर्समध्ये चांगली खरेदी झाली.

Web Title: Share Market Updates Sensex And Nifty Status At End Of Day 27th April 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top