300 रुपये भरा आणि बनवा तुमचा फोटो असलेलं टपाल तिकीट

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 24 November 2020

भारत सरकारने 'माय स्टॅम्प' (my stamp) योजनेच्या माध्यमातून एक विशेष योजना आणली आहे.

नवी दिल्ली: भारत सरकारने 'माय स्टॅम्प' (my stamp) योजनेच्या माध्यमातून एक विशेष योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या बऱ्याच आठवणी  जतन करू शकता. आता बरेचजण वाढदिवस आणि लग्नाच्या वाढदिवसा दिवशी टपाल तिकिटे जारी करू शकणार आहात. यासाठी आता तुम्हाला फक्त 300 रुपये खर्च करावे लागतील.

राज्यातील कोणत्याही मुख्य टपाल कार्यालयात तुम्ही 300 रुपयांत 12 टपाल तिकिटे सहज तयार करू शकाल. त्यासाठी पोस्ट विभागात याबद्दलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तुमच्या फोटोसह टपाल तिकिटासाठी तुम्हाला तुमच्या शहरातील किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा लागेल. फोटो असलेली टपाल तिकिटे जारी करण्याची एक महत्वाची अट असून त्यामध्ये ज्याव्यक्तीचा फोटो तुम्हाला पोस्टस्टॅम्प जारी करायचा आहे ती व्यक्ती तिथं असली पाहिजे.

'माई स्‍टाम्‍प' योजना
खरंतर भारत सरकारची एक जुनी योजना आहे पण याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. या योजनेअंतर्गत कोणीही किंवा एखादा सामान्य माणूस आपला फोटो टपाल तिकिटावरही छापू शकतो. या विषेश योजनेचे नाव 'माय स्टॅम्प' असे आहे. 'माई स्‍टाम्‍प योजनेत तुमच्या फोटोंसह 12 तिकिटे देण्यात येतात, ज्याचा उपयोग लग्नवेळी किंवा वाढदिवसाप्रसंगी भेटवस्तू देण्यासाठी केला जाऊ शकतो. याचा अर्थ तुम्ही टपाल खात्याकडून 12 टपाल तिकिटे जारी करू शकता.

आरबीआयच्या नावावर अनोखा विक्रम ; यूएस फेडला देखील टाकले मागे

2011 मध्ये झालेल्या Philately जागतिक प्रदर्शनादरम्यान 'माई स्‍टाम्‍प' योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत तुम्ही 300 रुपये नाममात्र शुल्क जमा करून तुमचे फोटो असलेली 12 टपाल तिकिटे जारी करता येणार आहेत. ही टपाल तिकिटे इतर टपाल तिकिटांप्रमाणे वैध असतील. तुम्ही देशाच्या एका कोणत्याही कोपऱ्यात या टिकीटांचा वापर करून पत्र किंवा इतर पोस्टही पाठवू शकता.

या योजनेअंतर्गत, कंपनी किंवा समूह त्यांच्या आवडीच्या फोटोंसह टपाल तिकिटेही जारी करू शकतात. त्यासाठी त्यांना 5 हजार शीट तिकिटे (1 शीटमध्ये 12 तिकिटे) जारी करावी लागतील. अशा तिकिटांवर  20% डिस्काउंटही दिला जातो.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: stamp yojana by post office of India can see your photo on tickets