Share Market Opening : बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स 60,000 पार; अदानींच्या 'या' शेअर्समध्ये तेजी

भारतीय शेअर बाजाराची सुरुवात शुक्रवारच्या तुलनेत आज थोडी चांगली झाली आहे
 Share Market
Share Market sakal

Share Market Opening : आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात शुक्रवारच्या तुलनेत आज थोडी चांगली झाली आहे, परंतु आजही सेन्सेक्सने घसरणीने सुरुवात केली. आज 2022 चा शेवटचा व्यावसायिक आठवडा आहे आणि त्याची वाटचाल खूप महत्वाची असणार आहे. आज, देशांतर्गत बाजाराच्या सुरुवातीला, सेन्सेक्स घसरणीसह उघडला आहे तर निफ्टी तेजीसह उघडण्यात यशस्वी झाला आहे.

आज आठवड्याच्या पहिल्या व्यापार सत्रात सेन्सेक्स 90 अंकांच्या घसरणीसह 59755 वर उघडला. निफ्टी 24 अंकांच्या वाढीसह 17830 वर उघडला. बँक निफ्टी 48 अंकांच्या वाढीसह 41716 वर तर मिडकॅप 100 फ्लॅट 30165 वर उघडला.

BSE India
BSE IndiaSakal

टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, स्टेट बँक, एलटी आणि महिंद्रा अँड महिंद्रा हे शेअर्स सध्या तेजीत आहेत. फक्त भारती एअरटेल आणि नेस्ले इंडियामध्ये घसरण होत आहे. ऑटो, बँक, रियल्टी, मेटल आणि पीएसयू बँकिंग निर्देशांकात बंपर तेजी आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 3,398 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले तर विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी केवळ 706 कोटी रुपयांचे समभाग विकले. याचा अर्थ एचएनआय आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्री केली. दीर्घ मुदतीचा विचार करून गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार भांडवली वस्तू, टेलिकॉम, बँकिंग आणि फार्मा क्षेत्रातील चांगल्या समभागांमध्ये गुंतवणूक करता येईल .

 Share Market
Bloomberg Billionaires Index : भारतातल्या 'या' 5 उद्योगपतींच्या संपत्तीत वाढ; पाहा पूर्ण यादी

शेअर बाजारात आज फार्मा, एफएमसीजी, बँक आणि आयटी क्षेत्रात तेजी दिसू शकते. दुसरीकडे, पीएसयू बँक, मीडिया, ऊर्जा आणि इन्फ्रा क्षेत्रात घसरण दिसू शकते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com