esakal | आठवड्याच्या सुरूवातीलाच शेअर बाजाराची घसरगुंडी
sakal

बोलून बातमी शोधा

The stock market plunged earlier in the week

आठवड्याच्या सुरूवातीलाच शेअर बाजारात घसरण झाली आहे. देशव्यापी लॉकडाऊन ३१ मेपर्यत वाढल्याचा नकारात्मक परिणाम गुंतवणूकदारांवर झाला आहे.

आठवड्याच्या सुरूवातीलाच शेअर बाजाराची घसरगुंडी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : आठवड्याच्या सुरूवातीलाच शेअर बाजारात घसरण झाली आहे. देशव्यापी लॉकडाऊन ३१ मेपर्यत वाढल्याचा नकारात्मक परिणाम गुंतवणूकदारांवर झाला आहे. सकाळी बाजाराची सुरूवात झाल्यानंतर  मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्समध्ये ८०० अंशांची घसरण झाली होती. सध्या सेन्सेक्स ३०४१४ अंशांच्या जवळपास व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असेलल्या निफ्टीमध्येदेखील 208अंशांची घसरण झाली आहे. निफ्टी सध्या ८,९४१ अंशांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून शेअरची विक्री करण्यात आली आहे. लॉकडाऊन वाढवल्यामुळे गुंतवणूकदार सावधपणेच गुंतवणूक करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

याशिवाय सरकारने जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेज आणि त्याच्या उपयुक्ततेसंदर्भातदेखील गुंतवणूकदार फारसे उत्साही दिसत नाहीत. आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात मात्र तेजी दिसून आली. कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये होत असलेल्या सुधारणांचा परिणाम आंतरराष्ट्रीय शेअर बाजारावर झाला आहे. याशिवाय अनेक देशांच्या आर्थिक व्यवहारांना सुरूवात होत असल्याचाही अनुकूल परिणाम दिसून आला. अमेरिेकेच्या शेअर बाजारात मात्र अस्थिरता दिसून आली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारी संबंधात पुन्हा तणाव निर्माण झाल्यामुळेच तसेच आर्थिक आघाडीवर फारशी जोरदार हालचाल होत नसल्याचाही परिणाम बाजारावर झाला आहे. युरोपातील बाजारात मात्र सुधारणा झालेली दिसून आली.
------
पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत काशी विश्वनाथ मंदिराचा मोठा निर्णय
------
पृथ्वीराज चव्हाणांवर टीका करणारे आचार्य तुषार भोसले आहेत तरी कोण?
------
ऑटोमोबाईल, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, बॅंकिंग, धातू या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. तर एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्यांच्या आणि आयटी कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत तेजी दिसून आली. रिअॅल्टी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्येही मोठी घसरण झाली आहे.
------
लॉकडॉऊन 4:0 च्या गाईडलाईन जाहीर; काय चालू, काय बंद?
-------
धक्कादायक ! ज्येष्ठ साहित्यिकाचे कोरोनामुळे निधन
-------
आयसीआयसीआय, झी एंटरटेनमेंट, कोल इंडिया, कोटक बॅंक आणि इंड्सइंड बॅंकेच्या शेअरच्या किंमतीत घसरण झाली आहे. तर सिप्ला, इन्फ्राटेल, इन्फोसिस, ब्रिटानिया आणि टीसीएस या कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत वाढ झालेली दिसून आली. वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्येदेखील घसरण नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. अनेक देशांच्या आर्थिक व्यवहारांना सुरूवात होण्याची चिन्हे दिसत असल्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत सुधारणा झाली आहे.