देशातील ही जुनी कंपनी एअर इंडिया विकत घेणार?

Air India
Air India

विस्तारा एअर इंडियासाठी बोली लावण्याची शक्यता
नवी दिल्ली - देशातील आघाडीची विमानसेवा कंपनी असलेली 'विस्तारा एअरलाईन्स' कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या एअर इंडियासाठी बोली लावण्याची शक्यता आहे. विस्तारा ही टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाईन्स यांची संयुक्त कंपनी आहे. यात टाटा सन्सचा हिस्सा सर्वात मोठा आहे. विस्तारा स्वंतत्रपणे किंवा आणखी एखाद्या गुंतवणूकदाराबरोबर भागीदारीत एअर इंडियासाठी प्रस्ताव देण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. 27 जानेवारीला केंद्र सरकारने अधिकृतपणे कर्जबाजारी एअर इंडियाचे 100 टक्के खासगीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे एअर इंडियासाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.

टाटांच्या 'विस्तारा'ने एअर इंडियासाठी बोली लावण्यामागे भावनात्मक आणि ऐतिहासिक कारणसुद्धा आहे. भारत सरकारने एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण करण्याआधी एअर इंडिया टाटांच्याच ताफ्यात होती. टाटांनी 1932 मध्ये एअर इंडियाची स्थापना केली होती. 1953 मध्ये एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण होईपर्यत एअर इंडिया टाटांच्याच ताब्यात होती. त्यामुळे एअर इंडियाचे अधिग्रहण करणे टाटांसाठी अनेक कारणांनी महत्त्वाचे आहे. मात्र टाटा समूहाकडून किंवा विस्ताराकडून यासंदर्भात अधिकृतपणे कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. सध्या टाटा समूह एअर इंडियाच्या प्रस्तावावर विचार करत असून विविध आर्थिक बाबींचा अभ्यास करत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. कर्जात बुडालेल्या एअर इंडियाचे अधिग्रहण करणाऱ्या कंपनीला त्या कर्जाचा बोझाही उचलावा लागणार आहे.

एअर इंडियाचे खासगीकरण करण्याचा भारत सरकारचा हा दुसरा प्रयत्न आहे. कोणताही योग्य प्रस्ताव न आल्याने पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला होता. मात्र दुसऱ्या प्रयत्नात सरकारने एअर इंडियावरील थकित कर्ज कमी केले आहे. याआधी एअर इंडियावर 62,000 कोटी रुपयांचे थकित कर्ज होते. मात्र आता केंद्र सरकारने भांडवली पुरवठा केल्यामुळे एअर इंडियावरील कर्ज 23,286 कोटी रुपये इतके आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com