जीवन विमा बचतीची गरज अन् फायदे माहितीये? जाणून घ्या एका क्लिकवर

आयुर्विमा संरक्षणाची किती गरज आहे?
Life-Insurance
Life-Insuranceesakal
Summary

आपल्याला कशाप्रकारचे जीवन विमाकवच हवे याचे अवलोकन प्रत्येकाने करण्याची गरज आहे.

"तुमच्या वेळेवर नियंत्रण (Time control) मिळवण्यासाठी पैशाचा (Money) वापर करा. तुम्हाला जे हवे आहे ते करण्याची क्षमता, तुम्हाला पाहिजे तेव्हा, तुम्हाला कोणा बरोबर हवे आहे, जोपर्यंत तुम्हाला हवे आहे तोपर्यंत, वित्तक्षेत्रात अस्तित्वात असलेला सर्वोच्च लाभांश (Dividends) देते." मॉर्गन हाऊसेलचे‘ सायकॉलॉजी ऑफ मनी’ हे पुस्तक पैशाच्या सामर्थ्याचे स्पष्टीकरण देण्याचे उत्तम काम करते–ते तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वेळेवर नियंत्रण मिळवून देऊ शकते. ते थोडक्यात जीवन विम्याचे कार्य आहे. हे आपल्या अवलंबितांसाठी आर्थिक सातत्य सक्षम करते आणि आपल्या विद्यमान संसाधनांचा निचरा टाळते. त्यामुळे, पुरेसे जीवन विमा कवच (Life insurance cover) आपल्याकडे असणे अगदीच महत्वाचे आहे. पण आशियात मृत्यू संरक्षण अंतर सर्वाधिक असल्याने भारताची यासंदर्भात खूपच वाईटस्थिती आहे, त्यामुळे आपल्याला कशाप्रकारचे जीवन विमाकवच हवे याचे अवलोकन प्रत्येकाने करण्याची गरज आहे.

बहुतेक भारतीय हे जीवन विमा बचतीचे साधन मानतात आणि अशा उत्पादनांना विमा लाभ पुरेसा आहे असे मानतात. असे असेल तर एक गोष्ट स्पष्ट करायला पाहिजे ती अशी की, आर्थिक अवलंबित्व असलेल्या प्रत्येक कमावत्या व्यक्तीने मुदत विमा (Term insurance) खरेदी करणे आवश्यक आहे. अरुण चे उदा. घेऊ, अरुणही ३५ वर्षांची विवाहित व्यक्ती असून त्याला एक मूल आहे. तुमचे जीवन विमाकवच हे तुमच्या उत्पन्नाच्या तुलनेत १० पट हवे. या ढोबळ नियमानुसार तो हा मुदत विमा खरेदी करणार आहे. अरुणचे १० लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न (Annual income) आहे, असे गृहित धरल्यास त्याच्यासाठी एक कोटी रुपयांचे विमा कवच योग्य ठरेल. उत्पन्नाच्या तुलनेत १० पटीपेक्षा जास्त किमान विम्याचे सुरक्षाकवच असणे हा चांगला ढोबळ नियम आहे. वेगळ्या शब्दात सांगायचे तर अरुणकडे विम्याचे पुरेसे सुरक्षाकवच नाही. त्यामुळे त्यात तो वाढ कशी करू शकेल हा प्रश्न आहे.

Life-Insurance
पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ

DIME पद्धत हे एखाद्याच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचे आणि त्याच्या भविष्यातील गरजांचे मूल्यांकन करण्यासाठी एक समग्रसाधन आहे. त्यामुळे अरुणसाठी नेमकी गरज काय आहे हे जाणून घेऊ:

कर्ज (Debt) : तुमची दायित्वे तुमच्यावर टिकून राहतात आणि म्हणून आवर्तीकर्जासाठी तरतूद करणे फार महत्वाचे आहे. अरुणवर दोन लाख रुपयांचे विद्यार्थी कर्ज थकीत आहे, असे समजूया.

उत्पन्न (Income) : तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी उत्पन्नाची बदली देऊ इच्छित असलेल्या वर्षांची संख्या विचारात घ्या आणि तुमच्या सध्याच्या उत्पन्नाचा त्या संख्येने गुणाकार करा.

अरुणला ५ वर्षांसाठी उत्पन्न बदलायचे असेल तर त्यासाठी त्याच्याकडे किमान ५० लाख रुपयांचा निधी हवा.

तारण (Mortgage) : पुढची पायरी म्हणजे गृहकर्जासाठी हिशेब ठेवणे. कारण हे एक मोठे कर्ज आहे जे तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिरता कमी करू शकते. अरुण यांच्याकडे ५० लाख रुपयांचे गृहकर्ज थकीत आहे असे समजू.

Life-Insurance
एलआयसीच्या जीवन अक्षयचे लाभ माहितीये? वृद्धापकाळ जाईल आरामात

शिक्षणाचा खर्च (Education expenses) : अरुण हे वडील आहेत हे लक्षात घेता, मुलीचे वय २५ वर्षे पूर्ण होईपर्यंत (सामान्यत: जेव्हा मुले कमवू लागतात तेव्हा) तिला आधार देण्यासाठी त्याला आर्थिक निधी तयार करावा लागेल. शिक्षणाचा खर्च सतत वाढत असल्याने अरुणला अंदाजे त्याच्या मुलीच्या पदवीपर्यंत ३५ लाख रुपयांच्या निधीची गरज आहे. त्यातच आणखी एक बाळ होणार असल्याने दुसऱ्या मुलाचे संगोपन आणि शिक्षणासाठी अतिरिक्त ५०लाख रुपयांची तरतूद करावी लागेल.

हे सर्व घटक अरुणच्या भविष्यातील गरजा दर्शवतात, ज्या १.८७ कोटी रुपयांच्या आहेत. परंतु यात एक गोष्ट कमी आहे. ती म्हणजे त्याने त्याच्या विद्यमान मालमत्तेचा हिशोब दिलेला नाही. मुदत ठेवी आणि म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून त्याच्याकडे १.६७कोटी रुपयांची मालमत्ता आहे, असे गृहित धरू. पण तरीही त्याची अंतिम आर्थिक गरज १.६७ कोटी रुपये आहे. अरुणचे १०वर्षांनंतर मृत्यू झाला व वार्षिक ४ टक्के महागाई दर असे गृहीत धरल्यास, त्याला २.४७ कोटी रुपयांच्या जीवनविमा कवचाची (त्याच्या सध्याच्या वार्षिक उत्पन्नाच्या जवळ पास २५ पट जास्त) गरज आहे.

वैयक्तिक वित्तसल्लागार याप्रक्रियेत तुम्हाला मदत करू शकतात. नेहमी लक्षात ठेवण्याचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे जीवनविमाही एकवेळची खरेदी नाही. तुम्ही तुमच्या संरक्षण गरजांचे नियमित अंतराने पुनरावलोकन केले पाहिजे. विशेषत: तुम्ही जीवनाच्या विविध टप्प्यांमधून प्रगती करत असताना एक चांगली संपत्ती संचययोजना आणि पुरेशा जीवन कवचासह तुमच्या कुटुंबाला त्यांच्या वेळेवर लक्षणीय नियंत्रण मिळवून देईल. या गरजा व्यक्तीनिहाय बदलू शकतात. प्रत्येक व्यक्तीसाठी हा एक योग्य वारसा ठरेल.

Life-Insurance
जीवन तारणारा गांधीविचार...

उदाहरणार्थ मोजणी

- कर्ज : रु २ लाख

- उत्पन्न रुपये : रु ५० लाख

- तारण : रु. ५० लाख

- शैक्षणिक खर्च : रु. ८५ लाख

- सध्याची मालमत्ता : रु. २० लाख

- दहा वर्षांसाठीचा हप्ता :--

- वार्षिक ४ टक्के महागाई दर

- डी + आय+ एम + इ = १.८७ कोटी रु.

- डीआयएमइ - विद्यमान मालमत्ता (भविष्यातील आर्थिक गरज) = १.६७ कोटी रु.

- भविष्यातील आर्थिक गरज x हप्ता x महागाई = २.४७ कोटी रुपये

(लेखक- अनुप सेठ, मुख्यवितरण अधिकारी, एडल वाईस टोकियो लाइफ इन्शुरन्स)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com