LIC ची ही दमदार पॉलिसी देईल म्हातारपणी साथ, अधिक जाणून घेऊयात... | LIC POLICY | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

LIC

LIC ची ही दमदार पॉलिसी देईल म्हातारपणी साथ, अधिक जाणून घेऊयात...

एलआयसीवर आजही बहुतांश लोकांचा विश्वास आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून याकडे पाहिले जाते. एलआयसी आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी विविध योजना आणते, यापैकीच एक म्हणजे एलआयसी जीवन उमंग पॉलिसी  (LIC Jeevan Umang Policy). जीवन उमंग पॉलिसी ही एंडोमेंट पॉलिसी आहे. या योजनेत तुम्हाला सुरक्षिततेसोबतच उत्पन्नाचाही लाभ मिळतो. तुम्ही या एलआयसी पॉलिसीमध्ये 15, 20, 25 किंवा 30 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता.

हेही वाचा: LIC प्रीमियम भरणे आणखी सोपे, UPI सोबत अकाउंट कसे लिंक करायचे, जाणून घ्या...

100 वर्षांपर्यंत लाइफ इंश्‍युरन्स

एलआयसी जीवन उमंग पॉलिसी  (LIC Jeevan Umang Policy) अंतर्गत, 90 दिवस ते 55 वर्षापर्यंतच्या सर्व व्यक्ती लाभ घेऊ शकतात. यामध्ये तुम्हाला लाइफ कव्हरसह मॅच्युरिटीवर रक्कम मिळते. तसेच, मॅच्युरिटी काळ पूर्ण झाल्यावर, तुमच्या बँक खात्यात निश्चित उत्पन्न येऊ लागते. यादरम्यान व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आणि नॉमिनीला एकरकमी रक्कम दिली जाते. या प्लॅनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला 100 वर्षांपर्यंतचे कव्हरेज मिळते.

हेही वाचा: LIC policy : मुलीच्या शिक्षणाची सोय आत्ताच करा; १२१ रुपये भरा आणि २७ लाख मिळवा

एलआयसीच्या या पॉलिसीद्वारे, तुम्हाला प्रीमियम भरल्याच्या मुदतीनंतर 100 वर्षांपर्यंत वार्षिक उत्पन्नाचा लाभ मिळू शकतो. यामध्ये तुम्हाला वार्षिक घेतलेल्या प्‍लॅनच्या 8 टक्के रक्कम दिली जाते. समजा तुमचे वय 26 वर्ष आहे आणि तुम्ही 4.5 लाख रुपयांच्या विमा संरक्षणासाठी जीवन उमंग पॉलिसी खरेदी केली आहे. त्यामुळे तुम्हाला त्यात 30 वर्षांसाठी प्रीमियम जमा करावा लागेल. जर तुम्ही 30 वर्ष पूर्ण प्रीमियम भरला तर 31 व्या वर्षापासून तुम्हाला 8% दराने वार्षिक 36,000 रुपये मिळू लागतील.

फायदे
- एलआयसी जीवन उमंग पॉलिसीमध्ये, पॉलिसीधारकाच्या मृत्यू किंवा अपंगत्व आल्यावर, रायडर टर्म अंतर्गत कव्हर दिले जाते.
- जर पॉलिसीधारक 100 वर्ष वयाच्या आधी मरण पावला, तर सर्व पैसे नॉमिनीला दिले जातील. यासाठी, पॉलिसीधारक त्याच्या सोयीनुसार एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये रक्कम घेऊ शकतो.
- तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत या पॉलिसीमध्ये सूट मिळते.
- जीवन उमंग पॉलिसी अंतर्गत, तुमच्यासाठी किमान 2 लाख रुपयांचा विमा काढणे अनिवार्य आहे.
- पॉलिसीधारक 100 वर्ष किंवा प्रीमियम भरण्याची मुदत संपेपर्यंत जिवंत राहिल्यास, प्रत्येक वर्षी त्याला मूळ विमा रकमेच्या 8 टक्के इतका सर्व्हायव्हल लाभ दिला जातो.