5 रुपयांचा पेनी स्टॉक नाही, छोटा पॅक बडा धमाका म्हणा

मल्टीबॅगर पेनी स्टॉक विकास लाइफकेअर (Vikas Lifecare) गेल्या काही काळापासून चर्चेत आहे.
Vikas Lifecare
Vikas LifecareSakal

मल्टीबॅगर पेनी स्टॉक विकास लाइफकेअर (Vikas Lifecare) गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. कारणही तसेच आहे कारण अगदी कमी काळात हा शेअर चांगला वाढला आहे. कंपनीने नुकताच बाजारातून 50 कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. Nomura Singapore Limited, Forbes EMF आणि AG Dynamics Funds Limited सारख्या FPI ने या निधी उभारणीत खरेदी केली आहे. विकास लाइफकेअरने या निधी उभारणी मोहिमेअंतर्गत एकूण 12,50,00,000 इक्विटी शेअर्स जारी केले आहेत त्यापैकी 5,40,00,000 इक्विटी शेअर्स फोर्ब्स EMF ला वाटप करण्यात आले आहेत तर 4,40,00,000 इक्विटी शेअर्स नोमुरा सिंगापोरला वाटप करण्यात आले आहेत. त्याच वेळी, एजी डायनॅमिक फंड्स लिमिटेडच्या शेअरमध्ये 2,70,00,000 इक्विटी शेअर्स आले आहेत. ही ऑफर 25 मे 2022 रोजी उघडली गेली आणि 2 जून 2022 रोजी बंद झाली. या शेअर्सचे वाटप प्रति शेअर 4 रुपये दराने करण्यात आले.

Vikas Lifecare
50 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा शेअर देईल मजबूत परतावा, तज्ज्ञांना विश्वास...

विकास लाइफकेअर शेअरच्या किमतीचा इतिहास पाहता, या शेअरने या वर्षी त्याच्या गुंतवणुकदारांना दमदार परतावा दिला आहे. गेल्या 1 महिन्यात, विकास लाइफकेअरचा शेअर 4.60 रुपयांवरून 5.40 रुपयांपर्यंत वाढला आहे. त्‍याने 1 महिन्‍यात 15 टक्‍के परतावा दिला आहे. या वर्षी आतापर्यंत, या शेअरने आपल्या 25 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे, तर गेल्या 6 महिन्यांत 60 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

हा शेअर गेल्या वर्षभरात मल्टीबॅगर ठरला आहे. NSE वर 7 मे रोजी त्याची किंमत 2.66 रुपये होती. जो सध्या 5.40 रुपये आहे. एका वर्षाच्या कालावधीत, स्टॉक सुमारे 101 टक्क्यांनी वाढला आहे. विकास लाइफकेअरचा शेअर हा अलिकडच्या वर्षांत भारतीय शेअर बाजाराचा आणखी एक मोठा पेनी स्टॉक ठरला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com