
नवी दिल्ली : लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याचे संकेत देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अभियानाअंतर्गत मोठी घोषणा केली. स्वावलंबनासोबत स्वदेशी वापराचे आव्हान करताना मोदींनी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. कोरोनाच्या लढ्यात जगातील इतर राष्ट्रांच्या तुलनेत ही सर्वाधिक मदत आहे, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केला आहे.
नवी दिल्ली : लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याचे संकेत देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अभियानाअंतर्गत मोठी घोषणा केली. स्वावलंबनासोबत स्वदेशी वापराचे आव्हान करताना मोदींनी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. कोरोनाच्या लढ्यात जगातील इतर राष्ट्रांच्या तुलनेत ही सर्वाधिक मदत आहे, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केला आहे.
जगभरातील अनेक देश सध्या कोरोना विषाणूच्या जाळ्यात आहेत. कोरोनाजन्य परिस्थितीचा सामना करत असताना लॉकडाउनमुळे जागतिक अर्थकारणावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. नरेंद्र मोदींनी जाहीर केलेले पॅकेज हे एकूण 'सकल राष्ट्रीय उत्पादन' (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) जीडीपीच्या 10 टक्के इतके आहे. जपान, अमेरिका आणि जर्मन या राष्ट्रांनी जीडीपीच्या अनुक्रमे 20, 14 आणि 10.7 टक्के खर्च करण्याचा निर्णय घेतलाय.वेगवेगळ्या राष्ट्रांनी जीडीपीच्या ठराविक टक्के भाग हा वेगवेगळ्या पातळीवर विभागून खर्च करण्याचे नियोजन आखले आहे. नजर टाकूया बड्या राष्ट्रांपैकी कोणत्या राष्ट्राने जीडीपीच्या किती टक्के खर्च कोरोनासाठी करण्याचे ठरवले आहे.
आता तरी थेट लोकांच्या खात्यात पैसे जमा करा : पृथ्वीराज चव्हाण
जपान
कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी जपानने आपल्या GDP तील सर्वाधिक 20 टक्के खर्च करण्याचे नियोजन केले आहे. जपानचा जीडीपी हा 4.97 लाख कोटी आहे. जपानमध्ये आतापर्यंत 15,847 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. याठिकाणी 633 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.
अमेरिका
जगातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आणि मृतांचा आकडा देखील भयावर असलेल्या अमेरिकेने जीडीपीच्या 14 टक्के रक्कम कोरोनासाठी खर्च करण्याचे नियोजन केले आहे. अमेरिकेचा जीडीपी 20.54 लाख कोटी USD इतका आहे.
कोरोनाचा सरकारी कर्मचाऱ्यांना फटका; 16 लाक कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात
जर्मनी
युरोपातील कोरोना विषाणूच्या लढाईत सर्वात आघाडीवर असलेल्या देशामध्ये जर्मनीचा समावेश होतो. जर्मनीने जीडीपीतील 10.7 टक्के निधी हा कोरोनासाठी खर्च करण्याचा आराखडा तयार केला आहे. सुरुवातीच्या काळात या ठिकाणी टेस्टिंगवर अधिक खर्च केला गेला. परिणामी मृत्यू दर कमी करण्यात त्यांना यशही आल्याचे पाहायला मिळाले. याठिकाणी आतापर्यंत 1, 72,812 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 7,676 लोकांनी आपला जीव गमावला आहे. जर्मनीचा GDP 3.95 लाख कोटी USD इतका आहे.
जगातील हे आहेत दानशूर; ज्यांनी दिली कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी मदत
ब्रिटन
युरोपमधील कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या ब्रिटनने जीडीपीच्या 5 टक्के खर्च करणार आहे. ब्रिटनचा GDP 2.86 लाख कोटी इतका आहे. याठिकाणी आतापर्यंत 2,26,463 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 32,692 लोक कोरोनाला बळी पडले आहेत.
चीन
कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळलेल्या चीनमध्ये जीडीपीच्या 3.8 टक्के भाग हा कोरोना लढ्यासाठी वापरण्यात येत आहे. चीनच्या वुहान शहरातून कोरोना विषाणू जगभर पसरला आहे. चीनमध्ये आतापर्यंत 82,919 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 4633 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. चीनचा जीडीपी 13.61 लाख कोटी USD इतका आहे.