Armed Forces Flag Day 2022 : लहानपणी शाळेत आपणही केलं होतं यात काँट्रिब्युट, आठवतंय?

कंपास पेटीवर, दप्तरावर, पाटी, वहीवर लाल, निळा आणि आकाशी रंगाचा झेंडा लावून देशप्रेमी म्हणून तुम्ही मिरवलंय का कधी? शाळेत मिळायचा हा झेंडा.
Armed Forces Flag Day 2022
Armed Forces Flag Day 2022esakal

कंपास पेटीवर, दप्तरावर, पाटी, वहीवर लाल, निळा आणि आकाशी रंगाचा झेंडा लावून देशप्रेमी म्हणून तुम्ही मिरवलंय का कधी? शाळेत मिळायचा हा झेंडा.

शाळेत असताना सैनिकांच्या मुलांना वह्या पुस्तकं घेण्यासाठी आमच्या बाईंनी काही झेंडे आमले होते. १ रुपयाला ते झेंडे घ्यायचे आणि कंपास पेटीला, दप्तराला लावाल्याचं मला आठवतं. आपला देश, आपले जवान म्हणून त्यावेळी झेंडे घेताना देशप्रेम फार उफाळून यायचं.

सैनिकांच्या मुलांसाठी, युध्दात अपंग झालेले सैनिकांसाठी, शहिद झालेल्यांच्या कुटुंबाला मदत म्हणून आपण शाळेत असताना जमेल तशी १० ते ५० रुपयांची मदत मागीतली जायची. त्यावेळी श्रीमंत मुलं १०० रुपयांची मदत करायचे, आठवतंय!

पण आता ७ डिसेंबर हा Armed Forces Flag Day आहे याची आठवण आहे का? आज या निमित्ताने पुन्हा एकदा ते लहानपणीचं देशप्रेम जागवूया...

Armed Forces Flag Day 2022
Armed Forces Flag Day 2022 : सशस्त्र सेना दिवसाविषयी १० मोठ्या गोष्टी

Armed Forces Flag Day सुरु करण्यामागचं कारण -

28 ऑगस्ट 1949 मध्ये भारताच्या तत्कालीन संरक्षणमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एका समितीची स्थापना करण्यात आली. कमिटीने निर्णय घेतला की 7 डिसेंबरला झेंडा दिवस साजरा केला जावा. झेंडा दिवस साजरा करण्याचा उद्देश सुरुवातीला नागरिकांमध्ये छोटे छोटे झेंडे वाटले जावेत आणि याद्वारे सैनिकांसाठी निधी गोळा करण्याचा होता. 

Armed Forces Flag Day 2022
Indian Armed Forces Flag Day 2020: का साजरा करतात भारतीय सशस्त्र सेना झेंडा दिवस?

या दिवसाच्या निमित्ताने आपल्या संरक्षणासाठी दिवसरात्र कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते. लहानपणी शाळेत हे कर्तव्य आपण नकळत बजावत होतो. आता मोठे आणि कमवते झाले आहोत ना? ही संधी साधून आपल्या देशप्रेमाला व्यक्त व्हायला एक वाट मोकळी करून द्या.

या दिवसानिमित्त आपल्या लष्कर, नौदल, वायूदलाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमधून जमा होणारा निधी Armed Forces Flag Day फंडात जमा केला जातो. ज्याचा वापर जखमी, आजारी, अपंग सैनिकांसाठी, त्यांच्या कुटुंबिय, मुलांसाठी केला जातो. यात आपणही सहभागी होऊया, आपल्या पुढच्या पिढीतही ही कृतज्ञताची भावना जागवू या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com