Mahendra Singh Dhoni : अबोल, अगम्य तरीही... अनभिषिक्त!

अखेर हेलिकॉप्टर ग्राउंडेड झाले आहे! धोनीने खेळाडू म्हणून पूर्ण निवृत्ती घोषित केली आहे.
mahendra singh dhoni

mahendra singh dhoni

sakal

Updated on: 

अखेर हेलिकॉप्टर ग्राउंडेड झाले आहे! धोनीने खेळाडू म्हणून पूर्ण निवृत्ती घोषित केली आहे. 'Mentor 'म्हणून तो सीएसके कडून क्षितिजावर दिसणार आहेच. काही वर्षांपूर्वी त्याची partial निवृत्ती अजिबात धक्कादायक नव्हती आणि ज्या पद्धतीने व्यक्त होत त्याने त्यावेळी निवृत्तीची घोषणा केली ती पद्धतही जगासाठी वेगळी असली तरी धोनीसाठी 'नॉर्मल'च होती! आपल्यासाठी larger than life अशी त्याची प्रतिमा असली तरी त्याने त्याची देहबोली ही अतिशय साधी अशीच संपूर्ण कारकीर्दीभर ठेवली.सगळ्यांमध्ये राहून त्याने त्याचे वेगळेपण आगळ्या पद्धतीने जपले.

Loading content, please wait...