Valentine Day: नातं समुद्राच्या लाटेचं किनाऱ्याशी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Valentine Day Special Love Story

Valentine Day: नातं समुद्राच्या लाटेचं किनाऱ्याशी...

Valentine Day Special Love Story: कोणत्याही नात्यात महत्वाचं काय असतं असं विचारलं तर प्रत्येकाच्या यासाठीच्या व्याख्या या वेगवेगळ्या असतील पण त्यातही सर्वात महत्वाचा असतो तो थांब पाठिंबा आणि उत्तम संवाद... आयुष्यात काहीही घडो आपल्या मनातल्या गोष्टी आपल्या जोडीदाराला सांगता आल्या पाहिजेत आणि वेळ पडेल तेव्हा त्याला साथ दिली पाहिजे, असं केलं तर कोणीच एकमेकांपासून कधीच दुरावणार नाही.

अनय आणि मानसी हे घटस्फोट घेऊ इच्छिणार जोडपं घटस्फोटासाठी न्यायालयात मागणी करून समुद्रावर आलं, दोघं घटस्फोट घेण्याचं कारण म्हणजे मानसीला आपल्या करियरवर फोकस करायचं होतं, याची सुरुवात परदेशात जाण्याच्या संधीने तिला चालून आली होती. अनयला मात्र भारतातच थांबायचं होतं, लग्नानंतर ते दोघेही नेहमी समुद्रावर येयचे, तासंतास भटकायचे, आजही ते आले होते... बहुदा शेवटचं भटकण्यासाठी...

पण दोघेही शांत होते, दुपारची वेळ होती.. समुद्रावरही तशी फार गर्दी नव्हती... अचानक अनय म्हणाला,

"आज कधी नव्हे ते, या बिचाऱ्या किनाऱ्याचा हेवाही वाटतोय आणि दुःखही होतंय"

मानसी गडबडली तिने पटकन विचारलं "म्हणजे?"

"बघ ना या किनाऱ्याच्या काही लाटा याला सहजपणे मिळतायआणि काही लाटा, त्या किनाऱ्यापर्यंत येता आहेत खऱ्या पण न मिळता परत जाताय..."

"मग त्यांनी काय करणं अपेक्षित आहे तुला?"

"इतक्या जवळ आल्यावर किनाऱ्याशी एकरूप होऊन त्या किनाऱ्याची थोडी माती आपल्या बरोबर घ्यावी नी मग जावं ना कुठे जायचयं तिथे"

"हो, पण त्या लाटेलाही जायचं असेल की दूरच्या प्रवासासाठी तिचीही काही लक्ष्य असतील, मग अशावेळेस किनारा दोन पाऊल पुढे टाकत म्हणाला की चल आता मला घेऊनच चल, तर काही अडचण आहे का?"

"म्हणजे जर किनारा दोन पाऊल पुढे टाकत हे सगळं म्हणाला तर लाट थांबेल??

इतक्या वेळ समुद्राकडे बघणारी मानसी अनयकडे बघायला लागते, "जर तिचा किनारा सगळ्यांच्या विरोधात जाऊन फक्त तिच्यासाठी दोन पाऊलं पुढे टाकत असेल तर ती का नाही थांबणार?"

अनय मानसीकडे एक क्षण बघतो तिचा हात हातात घेतो आणि "मग थांब ना, नको ना दुरावा, थोड्या दिवसांचा वेळ दे मला, मी पण येतो तूझ्या बरोबर, थांबशील??"

मानसी हसते आणि म्हणते, "वकिलांना तू फोन करतोय की मी करू??"

या वाक्याने अनय खूप घाबरतो, मानसीला थांबवण्याचा सर्वात शेवटचा पर्यायही संपला आहे असं त्याला वाटत.. जरा घाबरतच तो विचारतो... "कशाला?"

मानसी परत हसते, अनयच्या हातावर हात ठेवते, "डायव्होर्स प्रोसेस बंद करायला नको?"

अनय मानसीला घट्ट मिठी मारतो... अचानक एक मोठी लाट त्यांच्या पायांवर येऊन आदळते, दोघे एकमेकांकडे बघतात आणि हसतात...

मानसी म्हणते.. "बघ.. तिचा किनारा दोन पाऊलं पुढे आल्याचा परिणाम... आणि तुला सांगू ही लाट आहे ना ही खूप पुढे जाईल, माहितीये का... तिचा किनारा तिला पूर्णपणे मिळालाय ना, म्हणून..."

अनयच्या चेहऱ्यावर एक छान हसू येतं... तो फोन करून प्रोसेस थांबवायला सांगतो. दोघेही किनाऱ्यावर शांत बसतात.