कोल्हापुरात खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याचे आदेश; कोरोनाचे दोन रुग्ण सापडले

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 27 मार्च 2020

कोल्हापूर शहरातील एकजण कामानिमित्त पुण्यात होते. ही व्यक्ती शुक्रवारी (ता. 20) कोल्हापूरमध्ये आली आहे.

कोल्हापूर : कोरोनाशी आत्तापर्यंट टक्कर देत आलेल्या कोल्हापूर शहरात एक पुरूष आणि पेठवडगावमधील एका महिलेचा कोरोना तपासणीचे नमुणे पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे, चोवीस तास सर्तक आणि दक्ष असलेल्या जिल्हा प्रशासने हे दोन्ही रुग्ण कोण-कोणाच्या संर्पकात आले होते, याची चौकशी करण्यासाठी रात्री उशीराच यंत्रणा गतीमान केली आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव थांबवण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांनी खासगी दवाखाने ताब्यात घ्यावेत. दवाखाने ताब्यात घेवून आवश्योकतेनूसार खाट व बेडची संख्या ठेवावी. याशिवाय, वैद्यकीय उपकरणे, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या सेवेत घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आणखी वाचा - सांगलीत आणखी दोन रुग्ण वाढले वाचा सविस्तर बातमी

मंगळवारी इस्लामपूर येथील एका कुटूंबातील चौघांना कोरोनाची लागण झाली होती. याच कुटूंबात पेठ वडगाव येथील ती मुलगी शिक्षणासाठी राहत होती. दरम्यान, पाहुण्यांना कोरोना झाल्यानंतर ती पेठ वडगाव येथे आपल्या गावी आली होती. गावी आल्यानंतर या तरुणीने आपल्या इतर पाहुण्यांशीही संपर्क साधला होता. अनेक ठिकाणी फिरली होती. त्यामुळे, ज्या-ज्या ठिकाणी ही मुलगी फिरली त्या-त्या ठिकाणी चौकशी केली जाणार आहे. याउलट या ठिकाणी काही दिवस राहिल्यानंतर ती इतर नातेवाईकांच्या संपर्कात राहिली होती. दरम्यान, या तरूणीला मिरज येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 

आणखी वाचा - डोंबिवलीचा कोरोना रुग्ण लग्नात गेला हळदही खेळला

कोल्हापूर शहरातील एकजण कामानिमित्त पुण्यात होते. ही व्यक्ती शुक्रवारी (ता. 20) कोल्हापूरमध्ये आली आहे. त्यानंतर बुधवारी (ता. 25) सीपीआर येथे आरोग्य तपासणी करून घेतली होती. त्यानंतर आज या व्यक्तिच्या तपासणीचा अहवाल पॉझिटीव्ह आली आहे. कोल्हापूर शहरात असणारी ही व्यक्ती शुक्रवारपासून बुधवारपर्यंत (ता.25) कोणाच्या संपर्कात आली होती. याचा शोध घेवून त्यांची तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, ज्या परिसरात ही व्यक्ति राहत होती. त्या परिसरातील लोकांनी तात्काळ आपल्या तपासण्या करून घेतल्या पाहिजेत, असे चित्र आहे. 

निर्भिडपणे सामोरे जावू, पण आज कडक कायदा : सतेज पाटील 
कोल्हापुरात दोन रुग्ण आढळले ही वस्तूस्थिती आहे. इस्लामपूर, रत्नागिरीमार्गे हे संकट आपल्या वेशीवर आले होते. आता ते घरात आले आहे. पण, आपण सर्वांनी निर्भिडपणे या संकटाचा सामना करू. मात्र, उद्यापासून एकही व्यक्ती घरातून बाहेर पडणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे. पोलिसांकडून उद्या कायद्याची कडक अमलबजावणी केली जाईल. कारण, इस्लामपूरमध्ये 4 वरून 11 रुग्ण झाले. यावरून आपण दक्ष रहावे. तसेच, या रूग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी तात्काळ आपली तपासणी करून घेतली पाहिजे. 
- सतेज पाटील, पालकमंत्री, कोल्हापूर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus two persons positive kolhapur district