मरकज रोखता आले असते; हे हिंदू-मुस्लिम करणारांच्या हातात आयतं कोलीत : शिवसेना  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

News about editorial article in Samana

दिल्लीत झालेले मरकज हे रोखता आले असते, दिल्लीतील मरकज हे हिंदू-मुस्लिम करणाऱ्यांच्या हातात आयतं कोलीत दिल्यासारखे असल्याची टीका शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून केली आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागताच पोलिसांनी शाहीन बाग परिसर रिकामा केला. तसाच बळाचा वापर करून हे मरकजही रोखता आले असते. हा प्रश्न धार्मिक नसून राष्ट्राच्या आरोग्यविषयक सुरक्षेचा असल्याचेही अग्रलेखात म्हटले आहे.

मरकज रोखता आले असते; हे हिंदू-मुस्लिम करणारांच्या हातात आयतं कोलीत : शिवसेना 

मुंबई : दिल्लीत झालेले मरकज हे रोखता आले असते, दिल्लीतील मरकज हे हिंदू-मुस्लिम करणाऱ्यांच्या हातात आयतं कोलीत दिल्यासारखे असल्याची टीका शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून केली आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागताच पोलिसांनी शाहीन बाग परिसर रिकामा केला. तसाच बळाचा वापर करून हे मरकजही रोखता आले असते. हा प्रश्न धार्मिक नसून राष्ट्राच्या आरोग्यविषयक सुरक्षेचा असल्याचेही अग्रलेखात म्हटले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अग्रलेखात नेमके काय म्हटले आहे?
दिल्लीतील निजामुद्दीन भागात तबलीगी समाजाचा मरकज नावाचा धार्मिक कार्यक्रम १ ते १५ मार्चच्या दरम्यान झाला. या कार्यक्रमासाठी देशातील २२ राज्यांमधून आणि जगातील ८ देशांतून ५ हजारांवर लोक जमले होते. त्यातील ३८० लोक आता कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याने देशात हडकंप माजला आहे. या ५ हजारांच्या जमावात २ हजार परदेशी नागरिक होते. सारा देश कोरोनाच्या चिंतेने ग्रासला असताना, दिल्लीसारख्या शहरात गर्दी आणि झुंडी जमा करण्यावर निर्बंध लादलेले असताना ५ हजार लोक धर्माच्या नावाखाली जमले त्यामुळे त्याचा व्हायचा तोच परिणाम अखेर झाला. निजामुद्दीन परिसरात जमलेल्या या धार्मिक झुंडीने देशाला ३८० कोरोनाग्रस्तांचा नजराणा पेश केला आहे. हा सर्व प्रकार म्हणजे अक्षम्य बेफिकीरी व धर्मांध मस्तवालपणाचा नमुना आहे.

Coronavirus : महायुद्धानंतर पहिल्यांदाच विम्बल्डन स्पर्धा रद्द

मरकजनिमित्ताने जे लोक तेथे जमले त्यांनी राष्ट्राची व समाजाची अशी काय सेवा केली? किंबहुना नुकसानच केले. एका बाजूला देशातील सर्वच धार्मिक स्थळे गर्दी टाळण्यासाठी बंद केली असताना इस्लामच्या नावाखाली इतके लोक जमणे हे अमानुष आहे. दुबई, कुवैत, बहरीन, सौदी अरब अशा देशांमध्येही मशिदी बंद केल्या आहेत. लोकांनी घरच्या घरीच नमाज पठण करावे असे फर्मान तेथील राज्यकर्त्यांनी काढले आहे. तेदेखील मुसलमानच आहेत आणि इस्लामचे बंदे आहेत. तेथे राष्ट्रीय व सामाजिक सुरक्षेसाठी मशिदी व सार्वजनिक नमाजावर बंदी येऊनही इस्लाम संकटात आल्याची बांग कोणी ठोकलेली नाही, पण दिल्लीत मरकजची यात्रा घडली नसती तर धर्मावर काय मोठे आकाश कोसळले असते?

Coronavirus : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असलेल्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू

दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल लागताच पोलिसांनी शाहीन बाग परिसर रिकामा केला. तसाच बळाचा वापर करून हे मरकजही रोखता आले असते. हा प्रश्न धार्मिक नसून राष्ट्राच्या आरोग्यविषयक सुरक्षेचा आहे आणि मुसलमान समाजातील लोकही या कारवाईच्या मागे ठामपणे उभे राहिले असते. मरकजसाठी आलेल्या बेपर्वा तबलिगींनी आपापल्या राज्यांत परतताना ५ रेल्वे गाड्यांनी प्रवास केला. त्यातील काही लोक महाराष्ट्रातही आले. म्हणजे गाडीतील असंख्य लोकांना त्यांनी विनाकारण संकटात टाकले. खरे तर जे मरकजला गेले त्यांनी स्वत:हूनच पुढे यायला हवे. त्यात लपविण्यासारखे काय आहे? ताप, सर्दी, खोकलाच आहे. फक्त संसर्गजन्य असल्याने काळजी घ्यायची आहे इतकेच. जे हे लपवतात, ते देशाला फसवतात हे लक्षात घ्या. देशातील धर्मांध मुसलमानांच्या या प्रवृत्तीमुळेच येथे अनेकदा संघर्षाच्या ठिणग्या पडतात. त्यांच्याशी कठोरपणे वागावे तर त्यांना येथे असुरक्षित असल्याची भावना उफाळून येते आणि प्रेमाने वागावे तर मरकजसारखी प्रकरणे घडतात.