Corona virus : म्हणून अमेय वाघ एअरपोर्टवरील डॉक्टरांना म्हणाला, Thank You

Amey Wagh Thanks to the doctors at the airport.png
Amey Wagh Thanks to the doctors at the airport.png

मुंबई : 'अमर फोटो स्टुडिओ' नाटकाचा अमेरिका दौरा संपवून अभिनेता अमेय वाघ काल रात्री मुंबईत परतला. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल विमानतळावरील कोरोना व्हायरसबाबत केलेल्या उपाययोजनांचे अमेय वाघ याने कौतुक करून संपूर्ण विमानतळावरील कर्मचारी, डॉक्‍टर, पोलिस, आर्मी अधिकाऱ्यांचे आभार मानले. अमेय वाघने या संदर्भातील फेसबुक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने अमेरिकेतील आणि मुंबईत परतण्याचा अनुभव सांगितला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by amey wagh (@ameyzone) on

'अमर फोटो स्टुडिओ' नाटकाचा अमेरिका, कॅनडा दौरा होता. तीनच शो झाले. एकूण 14 शो होते, त्यापैकी 11 रद्द झाले. मग परत येण्याची धडपड सुरू झाली. कॅलिफोर्नियामध्ये वास्तव्यास होतो. तेथे ही फार भयंकर अवस्था होती. ग्रोसरी स्टोअरमध्ये ब्रेडपण मिळत नव्हता. तेथे माझ्या नातेवाइकांकडे राहिलो. त्यांनी माझी फार चांगली काळजी घेतली, असे त्याने अमेरिकेतील अनुभव सांगितले.
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by amey wagh (@ameyzone) on

परतीच्या प्रवासाबाबत तो म्हणाला, "सुदैवाने आम्हाला मुंबईमध्ये परतण्याचे विमानाचे तिकीट मिळाले. ते विमान भारतीयांनी खच्चून भरले होते. विमान मुंबईमध्ये लॅंड झाले. लॅंड झाल्यावर बाहेर पडताना येथून बाहेर पडायला किती वेळ लागेल, कोरोनाच्या टेस्टला किती वेळ जाईल याबद्दल खूप धास्ती होती. विमानतळावर उतरल्यावर अत्यंत फास्ट ट्रॅकने प्रवाशांची कोरोना टेस्ट झाली. टेस्ट घेणारे सर्व डॉक्‍टर तरुण असून ते मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आहेत. ते स्वतःचा जीव धोक्‍यात घालून आमची टेस्ट करत होते. त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो. विमानतळावरील कर्मचारी, अधिकाऱ्यांचेही आभार मानतो. त्यांनी अत्यंत उत्तम यंत्रणा राबविल्यामुळे काम फास्ट सुरू आहे, असेही अमेयने म्हटले. इमिग्रेशन अधिकारी, भारतीय सैन्यदलाचे अधिकारी, पोलिस यांच्या सहकार्याने महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी अत्यंत उत्तम उपाय होत आहेत, असे त्याने आर्वजून सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com