मुंबईप्रमाणे ठाण्यातही कोरोनाबाधीत क्षेत्र जाहीर करा : मनसे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 April 2020

मुंबईत कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या ठिकाणापासून आणि परिस्थितीनुरूप ठराविक परिघातील क्षेत्र हे 'कंटेनमेंट झोन' म्हणून जाहीर करण्यात आले आहे. ठाणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असून, मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही 'कंटेनमेंट झोन' (बाधित क्षेत्र) जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. शहरातील विविध भागांत दररोज किती रुग्ण सापडतात, तेथील नेमकी परिस्थिती काय आहे, याबाबतच्या अफवा रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने दैनंदिन माहितीही समाज माध्यमांद्वारे नागरिकांना द्यावी, अशी मागणीही मनसेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी केली आहे. 

ठाणे : मुंबईत कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या ठिकाणापासून आणि परिस्थितीनुरूप ठराविक परिघातील क्षेत्र हे 'कंटेनमेंट झोन' म्हणून जाहीर करण्यात आले आहे. ठाणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असून, मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही 'कंटेनमेंट झोन' (बाधित क्षेत्र) जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. शहरातील विविध भागांत दररोज किती रुग्ण सापडतात, तेथील नेमकी परिस्थिती काय आहे, याबाबतच्या अफवा रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने दैनंदिन माहितीही समाज माध्यमांद्वारे नागरिकांना द्यावी, अशी मागणीही मनसेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी केली आहे. 

मदतीचा हात : महामार्गावरील हॉटेलमालक ठरतोय अन्नदाता 

मुंबईत वरळी कोळीवाडा, आदर्श नगर, गोरेगाव येथील बिंबिसार नगर अशाच पद्धतीने 200 पेक्षा अधिक परिसर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. मात्र ठाणे पालिकेने अशी कोणतीही पावले न उचलल्याने ज्या भागात रुग्ण आढळून आले आहेत, त्या ठिकाणी रहिवाशांसह इतर भागांतून आलेल्या नागरिकांचा मुक्त संचार कायम आहे.

त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भीती महिंद्रकर यांनी व्यक्त केली आहे. अफवा रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने आपल्या भागात किती रुग्ण पॉझिटिव्ह आहेत, किती संशयित आहेत याविषयी सविस्तर माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर द्यावी, अशी मागणी महिंद्रकर यांनी पालिका आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे केली आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांची महत्त्वाचे : सरकारकडून प्रोत्साहन भत्ता जाहीर

कंटेनमेंट झोनमध्ये नेमके काय करतात?
   एक इमारत किंवा काही इमारती यांचा समावेश 'कंटेनमेंट झोन'मध्ये केल्यानंतर सदर परिसर बंदिस्त केला जातो. त्यानंतर सदर परिसरात प्रवेश बंदी लागू करण्यात येते. तसेच या परिसरातील नागरिकांना लागणाऱ्या अत्यावश्यक सेवा-सुविधा या इमारतीच्या किंवा परिसराच्या प्रवेशद्वारावर सशुल्क पद्धतीने देण्यात येतात. अशा परिसराच्या लगतच्या इमारती या 'बफर झोन' म्हणून निर्धारित करण्याचा व देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय परिस्थितीनुरूप घेतला जातो. 'बफर झोन' परिसरात केवळ अत्यावश्यक सेवांसाठी मर्यादित प्रवेश देता येतो.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Like Mumbai, declare restricted area in Thane also : MNS