पुण्यात फक्त किराणा, भाजी आणि औषध दुकानं चालणार!

coronavirus updates grocery medical and vegetable stores will remain open
coronavirus updates grocery medical and vegetable stores will remain open

पुणे Coronavirus : पुण्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, प्रशासानाने मोठी खबरदारी घेण्यास सुरुवात केलीय. शहरातील मॉल्स, शाळा-महाविद्यालये कालपासूनच बंद करण्यात आलीय. आता शहातील किंवा मॉलमधील किराणा, भाजी आणि औषध दुकानंच सुरू राहणार, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. दरम्यान, पुण्यात जमावबंदी आदेश लागू करण्याचा विचार असल्याचंही डॉ. म्हैसेकर यांनी स्पष्ट केलंय.

डॉ. म्हैसेकर यांनी आज रोजच्या प्रमाणे चार वाजता पत्रकार परिषद घेऊन शहरातील कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची माहिती दिली. त्यात त्यांनी विदेश दौरा करून आलेल्यांना आवाहन केले आहे. म्हैसेकर म्हणाले, 'पुण्यात पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाची पाच नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यातली चार जण हे यापूर्वी कोरोनाची लागण झालेल्या एका रुग्णाचे अतिशय जवळचे नातेवाईक आहेत. तर, एक जण थायलंडचा दौरा करून आला आहे. संबंधित व्यक्ती 94 जणांच्या ग्रुपमधून थायलंडला गेला होता. त्यामुळं आमच्यासाठी ही चिंतेची बाब आहे. परदेश दौरा करून आलेल्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी स्वतःला होम आयसोलेट करून घ्यावं, होम आयसोलेशन कसं असावं याचं परिपत्रक देण्यात आलंय. ते पुन्हा पुन्हा दिलं जाईल.' अशा व्यक्तींनी किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी विनाकारण सार्वजनिक ठिकाणी फिरू नये, असे केल्यास कारवाई करू, असा इशाराही म्हैसेकर यांनी यावेळी दिला. विदेशात जाऊन आलेल्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला त्रास देऊ नका, असं आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केलंय. या नागरिकांना सोसायट्यांमधून त्रास देण्यात आल्याच्या काही घटना कानावर आल्या आहेत. हे चुकिचं असून, असे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं डॉ. म्हैसेकर यांनी स्पष्ट केलंय. सध्या पुण्यात 57 जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

काय म्हणाले डॉ. म्हैसेकर?

  • किराणा, औषध आणि भाजीपाला दुकानच सुरू राहणार
  • ओपन पार्कस् बंद करण्याचा निर्णय 
  • शाळा, कॉलेज यापूर्वीच बंद करण्यात आली  
  • विदेशात जाऊन आलेल्यांनी प्रशासनाला माहिती द्यावी
  • त्यांनी स्वतःला घरात आयसोलेट करून घ्यावं
  • सार्वजनिक ठिकाणी जाऊन इतरांना लागण होईल, असे कृत्य करू नये

ओळख लपवू नका?
पुण्यात आतापर्यंत एनआयव्हीकडे 315 सॅम्पल पाठविले होते त्यापैकी 294 रिपोर्ट प्राप्त झाले असून, 15 वगळता बाकी रीपोर्ट  निगटेव्ह आले आहेत. गेल्या 24 तासात 5 नवीन रुग्ण आढळले आहेत. कालचे 4 रुग्ण संसर्गामुळे वाढले आहेत. मास्क लावून कोरोना संशयितांनी ओळख लपवू नये, असे आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी दिली. पुणे शहरात काल मॉल, उद्याने, शाळा बंद करण्यात असून फक्त आत्यावशक सेवाच सुरु राहणार आहेत. मेडीकल, जीवनआवश्यक वस्तूंची दुकाने चालू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com